Download App

Malegaon Election : ‘मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही’ अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

Ajit Pawar Statement On Malegaon Sugar Factory Election Supriya Sule : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, ते मतदार पार पडतील. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील, असंही त्यांनी (Baramati) म्हटलंय.

शरद संकुल याठिकाणी त्यांचा अड्डा

सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) बँक चौकशी मागणी केलीय. यावर कुणी काहीही मागणी केली, तर मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय. ज्या दिवशी आचारसंहिता सुरू झाली. त्या दिवसापासून शरद संकुल याठिकाणी त्यांचा अड्डा तिथेच आहे, असा पीडीसी बँकेच्या मुद्द्यावरून तावरे गटाला त्यांनी टोला लगावला आहे. ज्याचं त्याला लखलाब मला त्यात पडायचं नाही. पिडीसीसी बँकेत निळकंठेश्वर पॅनलचा एक तरी सदस्य होता का? असाच उलट सवाल अजित पवारांनी केलाय.

तोंड पाटिलकी का करताय? गेल्या 48 तासांत आंदोलन का नाही झालं? हिंदी सक्तीवरून मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष ठाकरे बंधूंवर भडकले

रात्री सुद्धा तिथे बसूनच राजकारण

आताही चला तिथे लोक बसलेले असतील. सहकाराच्या नियमांत आचारसंहितेच्या काळात कोणालाही त्या ठिकाणी बसता येत नाही. तिथे बसून त्यांच्या प्रचार करता येत नाही, याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तिथे बसूनच राजकारण चाललं होतं. मला रात्री फोन आलेला, दादा तिथे स्कॉड पाठवा बघा. काय होते, ते काय करायचं असंही अजित पवारांनी सांगितलं.

एसी, ना गादी! खासदार निलेश लंके चक्क जमिनीवर झोपले, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्काम का केला?

मिडिया यामध्ये महत्वाचा घटक

मी 35 वर्ष इथे काम करतो आहे. मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मीडियाने दाखवलं नसते, तर चर्चा झाली नसती. मिडिया यामध्ये महत्वाचा घटक आहे. निवडणुकीची रंगत तुम्हीच आणली. आमके विरूद्ध तमका, अशा बातम्या तुम्ही दाखवल्या. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली असंही अजित पवारांनी म्हटलंय. माझ्या मार्गदर्शनाखाली बॅंक चालत नाही, मी दोन वर्षांपूर्वीच राजीनामा दिलाय. मी फक्त एक सभासद आहे. माझा काही संबंध नाही. तरी देखील कोणाला वाटत असेल तर चौकशी करावी, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय.

 

follow us