Download App

सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, त्यांना धडा शिकवा; शरद पवारांचा वळसे पाटलांवर हल्लाबोल

Sharad Pawar on Dilip Walse Patil : विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीचा निकाल विरोधात दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी शड्डू ठोकला आहे. पवारांनी आंबेगाव मतदार संघातील कार्यकर्त्यांना वळसे पाटलांचा पराभव करण्याचे आवाहन केले.

येत्या दोन महिन्यांत आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू. निष्ठावंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल, हीच अपेक्षा तुमच्याकडून आहे, असे आवाहन त्यांनी केले. अजित पवार यांना राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर शरद पवारांची तोफ थेट मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडली.

Maratha Reservation : ‘हू इज जरांगे’, गुणरत्न सदावर्ते पुन्हा कडाडले

शरद पवार म्हणाले की, तुमच्या तालुक्यातील अनेक लोकांनी माझ्यासोबत काम केले. त्यातील अनेकांनी प्रामाणिकपणे काम केले, मात्र ते आज हयात नाहीत. निष्ठा ही त्यांची खासियत होती, पण आज आपण काय पाहतो? आम्ही त्यांना सर्व काही दिले. त्यांना आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पदही दिलं.मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा राखली नाही. ते गेले. असे लोक नागरिकांशीही एकनिष्ठ राहणार नाहीत. आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय

ते पुढे म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी आज जाहीर सभेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर बोलत आहे. आज काळ वेगळा आहे, देशातील चित्र वेगळे आहे. शेतीशी प्रामाणिक असलेले तुम्ही सर्वजण आज समोर आहात. देशात कुठेही गेलो तरी काळ्या मातीवर विश्वास ठेवणारा शेतकरी संकटात सापडलेला दिसतो. तो घाम गाळतो, पण पिकाला रास्त भाव मिळत नाही. असे झाले की शेतकरी कर्जबाजारी होतो. अशा परिस्थितीत सावकार आणि बँकाही घरातील वस्तू घेतात. सन्मानाने जगणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे अभूतपूर्व संकट आहे, अशी टीका केंद्र सरकारवर केली.

पुणे लोकसभा : वडगाव शेरीची ताकद मुळीक यांच्यासाठी बूस्टर ठरणार

follow us