Download App

video: पुणेकराने थांबवली आमदाराची गाडी; सायरन वाजवला म्हणून झाप झाप झापलं; पाहा व्हिडिओ

आमदार किशोर दराडे यांच्या गाडीचा सायरन वाजल्याने पुण्यातील नागरिकाने गाडीला थांबवून त्यातील ड्रावरला चांगलच सुनावलं.

  • Written By: Last Updated:

MLA Kishore Darade : पुणेकर आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी स्पष्टपणे समोरच्याला सांगून टाकतात. मग ते समोर कोणीही असो असं म्हणतात ते उगाच नाही. असाच एक प्रसंग समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार किशोर दराडे (Kishore Darade) यांची गाडी बाजीराव रोडवरून जात होती. त्यांच्या गाडीवर सायरन वाजत होता. अशावेळी त्यांची गाठ एका सुज्ञ पुणेकराशी पडली. मग काय त्यांनी चांगलच झापलं.

Company fire: सांगली औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

शिवसेनेचे आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना. त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत गाडी चालवली होती. एक सुज्ञ पुणेकरांनी गाडीचा सायरन का वाजत आहे? असा प्रश्न विचारला. त्याच गाडीमध्ये आमदार किशोर दराडे बसलेले होते. यावेळी पुणेकरांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली आणि त्याला चांगलंच सुनावलं.

पुणेकराने ड्रायव्हरला शीट बेल्ट का लावला नाही असा जाब विचारला. यावेळी आमदार दराडे हे पुणेकरांकडे पाहत राहिले. त्याचबरोबर पुणेकराने आमदार दराडे यांना खडे बोल सुनावले. आम्ही जनता आहे. आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार होतात. पोलिसांकडं नका पाहू, असंही या पुणेकराने चालकाला सुनावलं. आमदार दराडे हा सर्व प्रकार पाहत होते. शेवटी जाताना पुणेकराने शिवी देऊन तेथून काढता पाय घेतला.

बांग्लादेशातील कोणतं बेट मागत होता अमेरिका? नकार देताच शेख हसीनांचं सरकारच गेलं

किशोर दराडे यांना पुणेकराचा हा अवतार पाहून धक्काच बसलेला असणार. पण, त्यांची चूक होती त्यामुळे तेही त्याला काही बोलू शकले नसावे. किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. नुकतेच ते नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. किशोर दराडे हे दुसऱ्यांदा नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत.

follow us