माझे घर जळत असताना साधे सायरनही वाजवले नाहीत, आमदार संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप
बीडः मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमध्ये जिल्ह्यात मोठी जाळपोळ झाली. आमदार संदीप (MLA Sandip Shirsagar) क्षीरसागर यांचे घरही जाळण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) कार्यालय जाळण्यात आले.या कार्यालयात आमदार रोहित पवार व संदीप क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. माझे घर जळत असताना साधे सायरनही वाजविले नाहीत. पोलिस हातावर हात धरून बसले होते, असा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केलाय.
One Crore Bribe Case : लाचखोर अधिकारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात! 12 दिवसांपासून होता फरार
बीडमध्ये ठरवून जाळपोळ करणाऱ्या काही आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही.या लोकांना अद्याप का अटक झालेली नाही. त्या दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून शहरात जाळपोळ सुरू झाली होती. पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक होते. परंतु पोलिस हातावर हात देवून बसले होते. साधेही सायरनही त्यांनी वाजविले होती. या जाळपोळीवर संशय आहे. कारण आंदोलन करणारे आणि तोडफोड, जाळपोळ करणारे वेगळेच होते. जातींमध्ये भांडणे लावण्यासाठी षडयंत्र रचले असावे, असे मला वाटते, असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
“मुर्खों के सरदार”! काँग्रेस अन् राहुल गांधींवर PM मोदींची प्रखर शब्दात थेट टीका
जाळपोळीच्या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. व्यापारी हे घाबरलेले आहेत. या परिस्थितीत बीडमध्ये राहता येणार नाही, असे व्यापारी भूमिका घेऊ लागल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. तब्बल सात तास शहर जळत असताना पोलिस प्रशासनाकडून काहीच झाले नाही. ते तब्बल सात हातावर हात ठेवून का बसले होते,माझे घर जळत असताना साधे सायरनही वाजविण्यात आले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे,अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली आहे.
अधिवेशनात आवाज उठविणार
जाळपोळ आणि दगडफेक करणारे मराठा आंदोलक नव्हते, असा दावाही क्षीरसागरांनी केला आहे. काही समाजकंटकांनी हे घडवून आणले आहे. या पाठीमागील सूत्रधार पोलिस प्रशासनाने शोधून काढावा.सूत्रधारावर कारवाई न केल्यास येत्या अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठविला जाईल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.