दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या; विक्रम काकडेंची शाहंकडे मागणी

Award Padma Vibhushan posthumously to late DCM Ajitdada Pawar अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार विक्रमजी काकडे यांनी करण्यात आली आहे.

Award Padma Vibhushan Posthumously To Late DCM Ajitdada Pawar

Award Padma Vibhushan Posthumously To Late DCM Ajitdada Pawar

Award Padma Vibhushan posthumously to late DCM Ajitdada Pawar Vikram Kakade urges Amit Shah : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रमजी काकडे यांनी आज नवी दिल्ली येथे भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या मागणीचे निवेदन दिले.

‘वंदे मातरम’वर आक्षेप घेणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘मी कोणालाही घाबरत नाही’

या भेटीदरम्यान दिवंगत लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सादर केले.

इराणविरोधात अमेरिकेची नवी रणनीती; हवाई हल्ल्यांनी उद्दिष्ट साध्य न झाल्याने पर्यायी मार्गांचा शोध

स्व. अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात केलेले उल्लेखनीय कार्य, राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि जनतेशी असलेली त्यांची नाळ लक्षात घेता त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी विविध समकालीन व सार्वजनिक हिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल आमदार विक्रमजी काकडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version