Baramati Lok Sabha Election Supriya Sule Man blowing turha symbol: बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा जोरदार राजकीय सामना होत आहेत. नणंद-भावजय या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे बारामतीत ठाण मांडून बसलेत. तसेच आता पवार कुटुंबातील भावबंदकी राज्य बघत आहे. त्यात सुप्रिया सुळेंसमोर वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. ते आव्हान अजित पवार गटाने नाही तर एका अपक्ष उमेदवाराने उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह हे तुतारी वाजविणारा माणूस असे आहे. या चिन्हाबरोबर आयोगाच्या चिन्ह्यात नुसते तुतारी हेही चिन्ह आहे. ते पक्षाचे चिन्ह नसल्याने अपक्ष उमेदवारांना ते देता येते. हे चिन्ह बारामती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एका अपक्ष उमेदवाराला दिले आहे.
‘पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना सहकार्य केलं ही चूक’; शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली!
बारामती लोकसभा मतदारसंघातून सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना निवडणूक आयोगाने फक्त तुतारी नाव असलेले चिन्ह दिले आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांच्याकडून हारकत घेण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक आयोगाकडे हारकत नोंदविली आहे.
Lok Sabha Election : सुजय विखेंकडे 29 कोटींची संपत्ती; सोने, कोट्यवधींच्या ठेवी, शेजजमिनी कुठे ?
तुतारी फुंकणारा माणूस आणि तुतारी हे नाव सारखे आहे. राज्यपक्ष म्हणून आम्हास वाटप केलेले चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे. त्यामुळे नावात साम्य असल्याने मतदार यांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून त्या ठिकाणी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.
राजकीय खेळी की योगायोग
अनेकदा निवडणुकीत अनेक राजकीय खेळ्या खेळल्या जातात. त्यात सारखे नाव असलेले उमेदवार उभे करणे किंवा एखाद्या पक्षाच्या उमेदवासारखेच निवडणूक चिन्ह मागणे, अशा खेळ्या केल्या जातात. आता सुप्रिया सुळेंविरोधात असे चिन्ह देऊन राजकीय खेळी खेळली की योगायोग आहे, अशी चर्चा आहे. अनेकदा अटीतटीच्या लढतीमध्ये विरोधी उमेदवारांचे मताधिक्य कमी करण्यासाठी असे राजकारण केले जाते.