Download App

अजित पवारांना मोठा धक्का ! पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षाचा राजीनामा, तुतारी हाती घेणार ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, यश साने, ,पंकज भालेकर, राहुल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Ajit Gavane ncp resignation: पुणेः लोकसभा निवडणुकीला झटका बसलेले अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अजित पवार यांना बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा झटका बसलाय. शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांनेही पक्षाकडे राजीनामा दिला आहे.


शिंदे, फडणवीस अन् दादांसाठी धोक्याची घंटा… ‘मविआ’ विधानसभेलाही देणार दणका?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, यश साने, ,पंकज भालेकर, राहुल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठविला आहे. गेल्या आठवड्यात काही पदाधिकारी हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे शरद पवार हे पदाधिकारी फोडून अजित पवारांना धक्का देतील, असे बोलले जात होते. हे पदाधिकारी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची राजकीय चर्चा आहे. कारण 20 जुलैला पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आहे. या सभेत ते शरद पवार गटात प्रवेश करू शकतात.

ट्रेनिंग होल्ड करुन परत बोलावले : IAS पूजा खेडकर यांच्यावर पहिली मोठी कारवाई

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली आहे. तीन ठिकाणी पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत यश मिळविण्यासाठी अजित पवार यांनी पक्ष बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी बारामतीमध्ये मेळावा घेण्यात आला आहे. इतर भागात मेळावे घेतले जाणार आहे. तर शरद पवार हेही पक्ष बांधणीसाठी बाहेर पडणार असून, ते राज्याचा दौऱ्या करणार आहेत. त्यात पदाधिकारी फोडाफोडीचे राजकारण सुरू होईल, असे बोलले जात आहे.

follow us