Pune Crime BJP : पुण्यात भाजपच्या एका नेत्याकडून महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग (Pune Crime BJP) केल्याची घटना समोर आलीयं. पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे (Pramod Kondhre) यांच्यावर एका महिला पोलिस निरीक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप केलायं. या प्रकरणी कोंढरे यालाा पोलिसांनी अटक केलीयं. आधीच प्रमोद कोंढरे याच्यावर पुण्यातील अनेक पोलिस ठाण्यात विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असून आता आणखी एका गुन्ह्याची भर पडल्याचं समोर आलंय.
कधी हाताला, तर कधी पायाला फ्रॅक्चर, मराठी कलाकारांसाठी जून महिना ठरतोय काळजीचा!
सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त भाजपचे नेते शनिवार वाडा परिसरात एकत्र आले होते. त्यानंतर भाजपचे आमदार हेमंत रासने कार्यकर्त्यांना आणि तैनात असलेल्या पोलिसांना चहा पिण्यासाठी दुकानात घेऊन आले. याचवेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेत महिला पोलिस निरीक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. या घटनेनंतर महिला पोलिस अधिकाऱ्याने ही गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले.
अजितदादांच्या ‘अर्थ’ खात्यावर राहणार शिंदेंच्या शिवसेनेचा वॉच; एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश?
प्रमोद कोंढरे यांच्यावर पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात अनेक स्वरुपाचे आधीच गुन्हे दाखल आहेत. अशातच आता आणखी एका विनयभंगाच्या गुन्ह्याची भर पडलीयं. कोंढरे यांच्यावर खंडणी, धमकी, हल्ला, दंगल, मालमत्तांचे नुकसान, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, विनयभंगाच्या आरोपावर प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक काढून संबंधित महिला अधिकाऱ्याचे आरोप फेटाळून लावली आहे. या घटनेप्रकरणी महिला पोलिस अधिकाऱ्याने पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं. तर गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा दावा कोंढरे यांनी केलायं.