Download App

200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री तरीही..,; पवारांच्या शिलेदाराची फटकेबाजी

Amol Kolhe On BJP : पाच वर्षे माझ्यासारख्याकडे कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्याला हीच कामाची पोचपावती असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी फटकेबाजी केली आहे. तसेच महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागतोयं, ही कामाची पोचपावती असल्याचंही कोल्हे म्हणाले आहेत. शिरुर मतदारसंघावरुन महायुतीमध्ये धुमश्चक्री सुरु असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी भाजपवर (BJP) फटकेबाजी केलीयं.

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल

अमोल कोल्हे म्हणाले, महायुतीकडे जवळपास 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी मोठी ताकद असून असं असतानाही दोन्ही उमेदवारांची नावे घेतली आहेत, त्यात शक्यता व्यक्त केल्या आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटातून अजितदादांकडे येणार? किंवा प्रदीप दादा कंद भाजपमधून अजितदादांकडे येणार म्हणजेच महायुतीला मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागणार आहे. हीच कामाची पोचपावती असल्याची फटकेबाजी अमोल कोल्हे यांनी केली आहे.

Sandeshkhali Violence : संदेशखाली हिंसाचार प्रकरण; TMCचे नेते शेख शहाजहाँ यांना अटक

दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आढळराव पाटलांचा कोल्हेंनी पराभव केला होता. आढळराव पाटील यंदा शिंदे गटाकडून लढवणार असल्याच्या चर्चा सुरु असतनाच अजित पवारांनी पेच निर्माण केला आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार असणार, असा पवित्रा अजित पवार यांनी घेतला
आहे.

विधानसभा अध्यक्ष आले धावून; हिमाचलमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ फेल : सुख्खू सरकार थोडक्यात वाचले

…तर मी कोल्हेंविरोधात लढणार :
शिरुर लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. त्यात आता अजित पवार या जागेवर ठाम असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार का? असे सवाल करण्यात आले. त्यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित दादा यांनी निर्णय घेतला आणि आदेश दिला तर आपण आमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

follow us