मनोज जरांगे आता शरद पवारांचा बाप झालायं; आंबेडकरांचं वादग्रस्त विधान
Prakash Ambedkar News : मनोज जरांगेला सहा महिन्याआधी कोणी ओळखत नव्हत, आता जरांगे शरद पवारांचा बाप झाला असल्याची परिस्थिती असं वादग्रस्त विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे मराठा समाजातील बडे नेते म्हणून ओळखले जात आहेत. त्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलं आहे.
आयुष्मान खुरानाने अभिनय कारकिर्दीबद्दल सांगितली खास गोष्ट; म्हणाला, मला दुसरी संधी…
प्रकाश आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना हाताशी धरुन स्वराज्य प्रस्थापित केलं आहे. मनोज जरांगे यांना इतिहासात नाव कोरण्याची संधी मिळाली आहे. एक नवीन इतिहास मनोज जरांगे घडवू शकतात. सहा महिन्यांआधी मनोज जरांगें कोण होते हे कोणालाही माहित नव्हतं, पण आज शरद पवारांचाही बाप झाला असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप कराल तर; जरांगे व विरोधकांना शेलारांचा थेट इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आंबेडकरांनी एक सल्लाही दिला आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी हा ओबीसीसुद्धा लढायला तयार आहे पण त्यांची अट तुम्ही मान्य करा. माझं ताट माझ्याकडे अन् गरीब मराठ्यांचा ताट त्यांच्याकडे राहु देऊ, तर ओबीसीसुद्धा मराठा आरक्षणासाठी लढायला तयार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
अंतरवली ते मुंबई अशी पदयात्रा काढल्यानंतर मुंबईच्या वेशीवरच असतानाच राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी मनोज जरांगे यांच्या मागणीनूसार राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित केलं होतं. त्यानंतर सगेसोयरे मागणीच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं होतं.
10 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणादरम्यान, मध्यंतरीच्या काळात जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. यामध्ये अजय बारस्कर महाराज, संगिता वानखेडे यांनी पत्रकार परिषदा घेत मनोज जरांगे यांच्यामागे राजकीय शक्तीचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावल्याचं दिसून आलं होतं.