लोकसभेच्या रणधुमाळीतचं संजय काकडे संन्यास घेणार?; म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती…

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं  वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये […]

मला मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही... मी मदत केली नसती तर... 'त्या' चर्चांवर काकडे स्पष्टचं बोलले

Sanjay Kakade

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं  वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये संजय काकडे (Sanjay Kakade) कुठेही प्रचारात सहभागी झालेले दिसून आलेले नाही. त्यात आता त्यांना राजकारण सोडण्याचीच भाषा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (BJP Leader Sanjay Kakade On political Retirement)

सोन्याच्या दुकानाचं उद्घाटन अन् अजितदादा संजय काकडे झाले जिगरी दोस्त!

अजितदादांना मोठा भाऊ मानतो 

यावेळी काकडेंनी पवार कुटंबियांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की,  भाजपाने कोणत्याही पक्षात फूट पडली नाही. त्या त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत .मी अजितदादांना (Ajit Pawar) मोठ्या भावासारखा मानतो, पवार साहेबांना देशातले जेष्ठ नेते मानतो. पवार कुटुंबीयांनी निवडणुकीनंतर एकत्र यावं असं मला मनापासून वाटतं असेही ते म्हणाले. पवार कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहेत. निवडणुकीनंतर सगळी कटुता बाजूला ठेऊन पवार कुटुंबाने एकत्र यावं, अशी इच्छादेखील काकडे यांनी व्यक्त केली.

Sanjay Kakade : PM मोदींची कामं पुणेकरांपर्यंत पोहचविताना संजय काकडे चिंब भिजले

मोहोळांविरोधात तक्रार काकडे म्हणतात…

यावेळी पुण्यातून भाजपची उमेदवारी मिळालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधत करण्यात आलेल्या तक्रारीवरही काकडेंनी भाष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेसने पहिली आचारसंहिता तक्रार बीजेपीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर केली आहे. राम मंदिराचे पोस्टर्स वाटले त्यावर मोदींचा फोटो होता असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. त्यावर काकडे म्हणाले की, राम मंदिर हे जनता पक्षाच्या फायद्यासाठी बांधलेलं नाहीये. हिंदूंच्या देशामध्ये हे मंदिर होणं गरजेचं आहे. भाजपाचे कोणतेही धोरण नाही की मंदिर दाखवून मतं मागायची, आम्ही केलीली कामं भरपूर आहेत असं वक्तव्य संजय काकडेंनी केलं.

Exit mobile version