कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता

BJP Maharashtra State Executive List : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याच्या वक्तव्यानंतर राज्यासह देशातील राजकीय गणित ढवळून निघाली आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे विधान केले होते. त्याप्रमाणे त्यांनी भाकरी फिरवत स्वतःच अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. पवारांच्या या भाकरी नंतर आता भाजपनंदेखील कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत भाकरी फिरवली आहे. Bhaurao Karhade: […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (90)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (90)

BJP Maharashtra State Executive List : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याच्या वक्तव्यानंतर राज्यासह देशातील राजकीय गणित ढवळून निघाली आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे विधान केले होते. त्याप्रमाणे त्यांनी भाकरी फिरवत स्वतःच अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. पवारांच्या या भाकरी नंतर आता भाजपनंदेखील कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत भाकरी फिरवली आहे.

Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

भाजपकडून आज राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीसांसह अनेक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीतून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, काहींना बढती देण्यात आली आहे.

बारसूला जाण्याच्या मनाई आदेशाविरोधात, राजू शेट्टींची जिल्ह्याधिकाऱ्यांना नोटीस

यामध्ये पुणे शहर भाजपाचे (BJP) संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना बढती देण्यात आली आहे. त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले आहे. राज्य उपाध्यक्ष असेलले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना उपाध्यक्षपदावरून पायउतार करत विशेष निमंत्रितांमध्ये संधी देण्यात आली आहे.

अध्यक्षाची निवड ते जयंत पाटलांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर

तसेच तीनवेळा नगरसेविका राहिलेल्या वर्षा तापकीर या गेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष होत्या. त्यांनाही नव्या कार्यकारिणीत वगळण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर संधी हवी होती. मात्र, ती न मिळाल्याने त्यावेळी त्या नाराज झाल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते.

भाजपची नवी कार्यकारिणी कुणाकुणाला स्थान?

नवीन प्रदेश उपाध्यक्ष
महादेव भंडारी (कोकण), चैनसुख संचेती (पश्चिम विदर्भ), सुरेश हळवणकर (पश्चिम महाराष्ट्र), संजय भेगडे (पश्चिम महाराष्ट्र), अमर साबळे (पश्चिम महाराष्ट्र), स्मिता वाघ (उत्तर महाराष्ट्र), जयप्रकाश ठाकूर (मुंबई), संजय भेंडे (पूर्व विदर्भ), गजानन घुगे (मराठवाडा), राजेश पांडे (पश्चिम महाराष्ट्र), विक्रम बावस्कर (पश्चिम महाराष्ट्र), अतुल काळसेकर (कोकण) अजित गोपछडे (मराठवाडा), एजाज देशमुख (मराठवाडा), धर्मपाल मेश्राम (पूर्व विदर्भ) राजेंद्र गावित (उत्तर महाराष्ट्र)

सुधीर मुनगंटीवारांची विधानं चुकीची; जयंत पाटलांचा पलटवार

नवीन प्रदेश सरचिटणीस
माधवी नाईक (ठाणे), विक्रांत पाटील (कोकण), मुरलीधर मोहोळ (पश्चिम महाराष्ट्र), रणधीर सावरकर (विदर्भ), संजय केनेकर (मराठवाडा), विजय चौधरी (उत्तर महाराष्ट्र)

नवीन प्रदेश चिटणीस
भरत पाटील (पश्चिम महाराष्ट्र), संजय डेहणकर (पश्चिम विदर्भ), वर्षा तडहाळे (पश्चिम महाराष्ट्र), सुरेखा थेतले (कोकण), अरुण मुंडे (उत्तर महाराष्ट्र), महेश जाधव (पश्चिम महाराष्ट्र), राणी द्विवेदी (मुंबई), विद्या देवाळकर (पूर्व विदर्भ), अजय भोळे (उत्तर महाराष्ट्र), देविदास राठोड (मराठवाडा), शालिनीताई बूंधे (मराठवाडा), सरिता गाकरे (पश्चिम विदर्भ), योगिता पाटील (कोकण), सुरेश बनकर (मराठवाडा), किरण पाटील (मराठवाडा), नवनाथ पडळकर (पश्चिम महाराष्ट्र)

 

Exit mobile version