हॉटेल बुकिंग ते तरुणीवर दबाव चेतन चौधरीची कुंडली समोर; केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक माहिती

Ketan Agarwal murder case केतन आणि सियाचं लग्न ठरण्यापूर्वीच सिया आणि चेतन पुण्यातील काही हॉटेलमध्ये एकत्र थांबले होते, अशी माहिती

Ketan Agarwal Murder Case

Ketan Agarwal Murder Case

Chetan Chaudhary’s background revealed shocking details emerge in the Ketan Agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी आरोपी चेतन चौधरीच्या कथित हालचालींची नवी माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. सियासोबत विविध हॉटेलमध्ये केलेला मुक्काम, एका तरुणीने केलेले गंभीर आरोप आणि हत्या प्रकरणानंतर मित्रासोबत झालेल्या संभाषणामुळे चेतनच्या कथित हालचाली तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. केतन आणि सियाचं लग्न ठरण्यापूर्वीच सिया आणि चेतन पुण्यातील काही हॉटेलमध्ये एकत्र थांबले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी संबंधित हॉटेलमधील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

सातारा बँकेचा आखाडा गाजणार; चार मंत्री, आमदार, आजी-माजी खासदार रिंगणात !

नोव्हेंबर २०२५ मध्ये एनआयबीएम रोडवरील एका हॉटेलमध्ये चेतनने ऑनलाइन बुकिंग केल्याची माहिती आहे. रूम बुक करताना चेतनने आधारकार्ड, तर सियाने लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स हे ओळखपत्र दिल्याचे हॉटेल व्यवस्थापनाकडून पोलिसांना सांगण्यात आले. दोघांनी ३०४ क्रमांकाच्या खोलीत मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडल्याची नोंद असल्याचे तपासात समोर आले. यानंतर जानेवारी २०२६ मध्ये गुलटेकडी परिसरातील आणखी एका हॉटेलमध्ये दोघे थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातही हॉटेल व्यवस्थापकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

‘आज माझं खुश आहे मन, कारण ठाकरे बंधू करताहेत आंदोलन’; रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंना टोला

दरम्यान, चेतनच्या कथित वर्तनाबाबत लातूरहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीने पोलिसांना दिलेला जबाबही चर्चेत आला आहे. ९ मे २०२६ रोजी एस. बी. रोडवरील एका क्लबमध्ये चेतनसह चौघे जण पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर चौघे मार्केटयार्ड परिसरातील एका लॉजवर गेल्याचे तपासात समोर आले. तेथे संबंधित तरुणीची मैत्रीण तिच्या प्रियकरासोबत एका खोलीत गेली, तर तरुणी चेतनसोबत दुसऱ्या खोलीत थांबली होती. त्यावेळी चेतनने शारीरिक संबंधांसाठी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे.

‘द स्पिरिट्स हॅव अरायव्ह्ड!’ — जॉनी डेप साकारणार एबेनेझर स्क्रूज; ‘एबेनेझर: अ ख्रिसमस कॅरोल’चा नवा ट्रेलर रिलीज

यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीला प्रकार सांगितला. चेतनने यापूर्वीही दोन-तीन वेळा आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे मैत्रिणीनेही पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.केतनच्या हत्येनंतर चेतनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. २२ जून रोजी चेतनने एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मित्राशी संपर्क साधला होता.

शाळेच्या सहलीची धमालमस्ती 9 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर “सहल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

लोणावळ्यात गाडीचा अपघात झाल्याची आणि त्यानंतर आपण तेथून निघून आल्याची माहिती त्याने मित्राला दिल्याचे तपासात समोर आले आहे. याच संभाषणादरम्यान वाहन आणि मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर धमक्या येत असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील चॅट डिलीट केल्यानंतर ते पोलिसांना पुन्हा मिळू शकतात का, अशी विचारणा चेतनने मित्राकडे केल्याचे तपासात समोर आले आहे. क्राईम ब्रँच किंवा मोबाइल कंपनीमध्ये ओळखीची व्यक्ती आहे का, याचीही त्याने चौकशी केल्याचा दावा पोलिस तपासातून करण्यात आला आहे.

अभिनेता डिनो मोरियाला मुंबई पोलिसांकडून अटक; ठाकरेंच्या काळातील मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई

मित्राने डिलीट केलेला डेटा पोलिसांकडून रिकव्हर होऊ शकतो का?,असे सांगितल्यानंतर दोघांची ठरलेली भेटही झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतरच चेतन आणि सियाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.हॉटेलमधील नोंदी, ओळखपत्रांची माहिती, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि मोबाइल- सोशल मीडिया व्यवहार या सर्व बाबींची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे केतन हत्याकांडात चेतनची नेमकी भूमिका आणि त्याच्या हालचालींचा घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी हे पुरावे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

Exit mobile version