Devendra Fadnavis on Pakistani Citizens : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान (Pahalam Terror Attack) विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. भारतात व्हिसा घेऊन विविध कामांनिमित्त आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. या लोकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. आज मुदतीचा अखेरचा दिवस आहे. या मुदतीत जे पाकिस्तानी भारत सोडणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना देशाबाहेर पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यातून एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. सर्व सापडले आहेत. त्यामुळे चुकीच्या बातम्या देऊ नका असे फडणवीस म्हणाले आहेत.
CM फडणवीसांनी दिली गुडन्यूज! केंद्र सरकार आणखी 10 लाख घरांना देणार मंजुरी; बेघरांना मिळणार घर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पाकिस्तानी नागरिकांबाबत काय कार्यवाही केली जात आहे याची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय कृपया यावर उलट्यासुलट्या बातम्या करू नका. 107 नागरिक बेपत्ता झाले असे म्हणता असे काही नाही एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. जितके पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडले आहेत. सगळ्यांना पाकिस्तानात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक येथे राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांना परत पाठवलं जाईल.
अनधिकृत फ्लेक्सवर टाच आणण्याची गरज आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर आपली जाहीरातबाजी केली पाहीजे. फ्लेक्स लावू नयेत. मी स्वतः सगळ्या महापालिकांना सांगितलं आहे की माझ्या स्वतःचे जरी अनधिकृत फ्लेक्स कार्यकर्त्यांनी लावले असतील तर तेही काढून टाका अशा सूचना मी दिल्या आहेत. यावर आता कडक भूमिका घ्यावी लागेल कारण यामुळे आपली शहरे विद्रूप होत आहेत.
राज्यात 5 हजारांहून अधिक पाकिस्तानी, नागपूरमध्ये सर्वाधिक; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. नागपुरात 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले आहेत तर ठाण्यात 1 हजार 106 नागरिक आढळून आले आहेत. मुंबईमध्ये 14 पाकिस्तानी नागरिक राहतात अशी माहिती समोर आली आहे. या नागरिकांपैकी फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्रे मिळाली आहेत तर 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही असे सांगितले.