Download App

बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती; अजित पवारांकडून जाहीर कबुली

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायलाच नको होती, असे अजित पवार यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं. 

Ajit Pawar on Baramati Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुन्हा खासदार झाल्या. या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होती. यात सुळेंनी बाजी मारली. आता सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) पराभव का झाला. यामागे काय कारणं आहेत? याचा शोध महायुती त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेतला जात असेलही. पण या निवडणुकीत जी मोठी चूक झाली ती अखेर अजितदादांनी (Ajit Pawar) मान्य केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायलाच नको होती, असे अजित पवार यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं.

Ajit Pawar: लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आमचं बटन.. काय म्हणाले अजित पवार?

बारामतीत कोण लाडकी बहिण आहे असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, बारामतीमधील माझ्या सगळ्याच बहिणी लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांत राजकारण चालतं पण राजकारण कधी घरात येऊ द्यायचं नाही या मताचा मी आहे. मागे माझ्याकडून एक चूक झाली. मी बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं पार्लियामेंटरी बोर्डाने तसा निर्णय घेतल होता. पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. आज माझं मन मात्र मला सांगतं की तसं व्हायला नको होतं.

बारामतीत बहिणींची भेट घेणार का या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे त्याच काळात जर मी तिथे असेल तर आणि माझ्या बहिणी पण तिथे असतील तर मी जरूर जाईन असे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले. दरम्यान, अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यात दौरा सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांपेक्षा कमी दिवस राहिल्याने या यात्रेला महत्व प्राप्त झाले आहे.

Sanjay Raut: बारामतीतून लाडक्या बहिणी अजित पवारांना पराभूत करतील; संजय राऊतांचा घणाघात

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर त्यांना राज्यसभेवर घेत महायुतीने सुनेत्रा पवार यांना खासदारकी बहाल केली. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर अजित पवारांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेतल्या. यामध्ये जनतेचं मत, सरकारच्या योजना, अर्थसंकल्प यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

follow us