Video : मी संसदेत बोलले की लगेच घरी लव्ह…; नवऱ्याचा उल्लेख करत सुळेंचं मोठं विधान

  • Written By: Published:
Video : मी संसदेत बोलले की लगेच घरी लव्ह…; नवऱ्याचा उल्लेख करत सुळेंचं मोठं विधान

सोलापूर : मी संसदेत बोलले की लगेच माझ्या घरी माझ्या नवऱ्याला आयकर खात्याकडून नोटीस येते. कालच नोटीस आल्याचेही सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) सांगितले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. संसदेत तुम्ही प्रश्न मांडल्यावर आयकर खात्याकडून तुमच्या पतींना नोटीस येते, त्यावर सुळेंनी उत्तर दिले. आज पुन्हा बोलल्याने पुन्हा नोटीस येईल असेही त्या म्हणाल्या. मात्र, येणाऱ्या या नोटीसीला आम्ही नाोटीस नाही तर, लव्ह लेटर बोलतो” असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी मतभेद भोवले, सचिव व्ही राधा यांची तातडीने बदली

महाराष्ट्रात महागाई, रोजगार आणि भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला असून, हे सरकार आल्यापासून अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्र सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जवाबदार असल्याचे म्हणत सुळे म्हणाल्या की, मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे ही संपूर्ण सरकारची ही जबाबदारी आहे. मात्र, सरकार एक म्हणत आहे आणि त्यांचे मंत्री दुसरचं बोलतात.

“सर्वात जास्त संसदेत मी बोलले आहे. मी आमच्या संघटनेबद्दल जबाबदार आहे. आम्ही दडपशाही केलेली नाही. विरोधात बोललो म्हणून इन्कम टॅक्स नोटीस काढलेली नाही. आमच्या 70 वर्षांचा हिशोब काढता, आम्ही कधी असं गलिच्छ राजकारण केलेलं नाही. सत्तेत आल्यावर करणारही नाही” मी जेंव्हा बोलते तेव्हा माझ्या नवऱ्याला नोटीस येते असे म्हणत कालच एक नोटीस आल्याचा खुलासा सुळेंनी केला.

शिंदे सरकारची शिंदेशाही; विरोधात काम केल्यास ‘लाडकी बहिण’मधून नाव डिलिट, आमदाराची धमकी

हे फडणवीसांच्या इंटेलीजन्सचं फेल्युअर

राज ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल तर हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इंटलीजन्सच फेल्युअर असल्याचेही सुळे म्हणाल्या. तसेच येणाऱ्या विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदासाठी मविआचा चेहरा कोण असेल यावर बोलताना आम्ही चेहऱ्यात अडकत नाही. लोकसभेला सर्वात कमी सीट आम्ही घेतल्या. आम्हाला पदात जास्त इंटरेस्ट नसल्याचेही सुप्रिया यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube