Pune News : राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनेतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. या घटनांना आळा घालून महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यात तथा बारामतीत ज्या घटना घडत आहेत. त्या घडायला नकोत. यासाठी काही पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे. यासाठी माझी आज सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.
यानंतर आम्ही शक्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन (Pune Police) या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. या अभियानात पंचशक्ती आहे. शक्तीबॉक्स तक्रार पेटीही आहे. यात पीडितांना आपलं म्हणणं मांडता येईल. तक्रार करता येणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र ते झारखंड; अजित पवारांसोबत भाजपचं ‘राजकीय प्रँक’ समजून घ्या, कारणं काय?
शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये यांसारख्या ठिकाणी शक्तीबॉक्स ठेवण्यात येणार आहे. या बॉक्समध्ये तक्रार करता येईल. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. मुलींना तक्रार करता यावी यासाठी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या अंतर्गत एक हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा हेल्पलाइन नंबर चोवीस तास सुरू राहणार आहे. या नंबरवरही महिला आणि मुली तक्रार करू शकतील.
महिला आणि मुलींना त्यांची तक्रार निर्भयपणे मांडता येईल यासाठी पोलीस ठाण्यात शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षात दोन महिला पोलीस असतील. भयभीत न होता तक्रार मांडता यावी असे वातावरण या कक्षात निर्माण करण्यात येणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन महिला आणि मुलींच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.
आता बारामती शहर मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. जिल्हा म्हणूनच या शहराकडं पाहिलं जातं. पुणे, (Pune City) पिंपरी चिंचवडनंतर बारामतीचा नंबर (Baramati) लागतोय. अशा परिस्थितीत शहरातील कायदा सु्व्यवस्था अबाधित राखणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला पाहिजे असे आवाहन अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत केले.
अजित पवार गटासह भाजपचे अनेक लोक संपर्कात, रोहित पवारांचा मोठा दावा