अजित पवार गटासह भाजपचे अनेक लोक संपर्कात, रोहित पवारांचा मोठा दावा
Rohit Pawar On Ajit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा शालेय गणवेशावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. माझा शर्ट हा माझा स्वतः च आहे. अजून मुख्यमंत्री यांनी मला शर्ट दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिलेले आश्वासन त्यांनी पाळले नाही. ही अवस्था आमची असेल तर सामान्य मुलांची काय असणार? अशी टीका माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली तसेच काही नेत्यांनी यातून मलिदा खालंला आहे असा आरोप देखील त्यांनी केला.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटातील काही नेते पुन्हा पक्षात प्रवेश करणार आहे असा दावा देखील त्यांनी केला. यावेळी रोहित पवार म्हणाले की, अनेक जण संपर्कात आहे मात्र ठराविक जण परत येतील. सगळ्यांनाच परत घेतल जाणार नाही. काही गोष्टी मला येथे बोलता येणार नाही. दादाचं नाही तर भाजपचे अनेक लोक संपर्कात आहेत. असा दावा माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी केला.
आज राज्यात महाविकास आघाडीसाठी (MVA) सकारात्मक वातावरण आहे. सर्व नेते साहेबांच्या संपर्कात आहेत, बरेच जण संपर्कात आहेत. निष्ठावान यांना डावललं जाणार नाही. जे लोक शरद पवार साहेबांना भेटत आहे त्यांना देखील माहिती आहे की राज्यात महाविकास आघडीला सकारात्मक वातावरण आहे.
राज्य सरकारने देशी गायला राज्य माता म्हणून घोषित करण्यात निर्णय घेतला मात्र हे निर्णय फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. जेव्हा राज्यात दुष्काळ होता तेव्हा याच गायींना चारा, पाणी मिळत नव्हता तेव्हा राज्य सरकारने काहीच मदत केली नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
काही दिवसापूर्वी काही भागात रोहित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते यावर उत्तर देत रोहित पवार म्हणाले की, आता कोण मुख्यमंत्री आणि मंत्री हे विचार करण्यापेक्षा महायुतीच्या सरकारला हद्दपार करायची वेळ आलेली. हा विचार नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी करावा. मला पक्षात डावललं जात आहे ही फक्त चर्चा असून आमच्यात कुठे ही गटतट नाही. महाविकास आघाडीचं सरकार यावे यासाठी प्रयत्न करत आहे असं देखील माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले.
NEET PG 2024 परीक्षेचा पॅटर्न बदलण्याविरोधात याचिका, 4 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी
गिरीश महाजन यांचा चिखलमध्ये मोटर सायकल चालवण्याचा व्हिडिओ व्हायरल झालं. कमल चिखलात उमलत. तुम्ही तुमच्या मतदारांसघात फिरतात. राजकारणाचा चिखल फडणवीस यांनी केलाय. तुम्ही चिखल चिखल खेळत आहेत. पवार साहेब माझे मेंटोर आहे. पवार माझ्याविषयी बोलत असतील तर ते माझ्यासाठी मोठ आहे. आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.