NEET PG 2024 परीक्षेचा पॅटर्न बदलण्याविरोधात याचिका, 4 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी

  • Written By: Published:
NEET PG 2024 परीक्षेचा पॅटर्न बदलण्याविरोधात याचिका, 4 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी

NEET PG 2024: संपूर्ण देशात 11 ऑगस्ट रोजी झालेल्या NEET PG परीक्षेचा पॅटर्न बदलण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. NEET PG परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या एका ग्रुपने नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन फॉर मेडिकल सायन्सेसने सेट केलेल्या परीक्षेच्या पॅटर्नला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

या याचिकेत रीक्षेच्या तीन दिवस आधी बदललेल्या पॅटर्नबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. माहितीनुसार, इशिका जैन आणि इतरांनी दाखल केलेल्या या याचिकेत याचिकेत NEET PG 2024 च्या उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी परीक्षेची दोन भागात विभागणी करण्यात आल्याने गुणांचे प्रमाणीकरण करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

ज्येष्ठ वकील विभा दत्ता माखिजा आणि तन्वी दुबे यांनी दावा केला आहे की NBEMS ने परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केले ज्यामुळे मोठी शंका निर्माण झाली. विभा दत्ता माखिजा आणि तन्वी दुबे सर्वोच्च न्यायालयात NEET PG उमेदवारांचे प्रतिनिधित्व करत आहेत. विभा दत्ता माखिजा म्हणाल्या की, “प्रमाणित दृष्टिकोनाची गरज आहे, परीक्षा कशा घ्यायच्या याविषयी कोणतेही नियम नाहीत. सर्व काही एका माहिती बुलेटिनवर अवलंबून असते जे अधिकार्यांच्या इच्छा आणि आवडीनुसार सुधारित केले जाऊ शकते.”

Chinese Military : अमेरिकेकडून तैवानला मोठी लष्करी मदत, चीनने दिला इशारा

तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे नेतृत्व करणारे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले की, परीक्षेच्या तीन दिवस आधी परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे. ते म्हणत आहेत की तुम्ही नियम बनवले नाहीत आणि सर्व काही माहितीपत्रकानुसार होते आणि परीक्षेच्या तीन दिवस आधी परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न बदलला जातो. तुम्ही हे सगळं कसं करू शकतात असा प्रश्न न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी विचारला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube