NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर; असा तपासा निकाल

  • Written By: Published:
NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर; असा तपासा निकाल

NEET PG 2023 चा निकाल जाहीर झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करून दिली आहे. या परीक्षेत बसलेले विद्यार्थी natboard.edu.in या अधिकृत साइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

यावर्षी NEET PG परीक्षा 5 मार्च 2023 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सुमारे 2.09 लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. 5 मार्च रोजी 277 शहरांमधील 902 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.

असा तपास निकाल

जााहीर करण्यात आलेला निकाल पाहण्यासाठी सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना NBE च्या natboard.edu.in वर भेट द्यावी लागेल. वरील साईटवर गेल्यानंतर NEET PG 2023 निकाल लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करावे. या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थी डाऊनलोड करून त्याची प्रिंटदेखील घेऊ शकणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube