Devendra Fadnavis On Pune Hit And Run Case : 19 मेच्या पहाटे दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र प्रकरणात आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये पुण्यातील ही घटना गंभीर असून अपघातानंतर ( Pune Hit And Run Case) लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरोपी विरोधात कलम 304 अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. मुलगा अल्पवयीन असताना गाडी चालवायला देणं चुकीचे असल्याने आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच बरोबर अल्पवयीन मुलाला दारू दिल्यामुळे पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ड्रंक अँड ड्राईव्ह (drunk and drive) विरोधात राज्यात कडक कारवाई होणार. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्याचा आहे. या प्रकरणात पोलिसांनी सबळ पुरावे दिले होते मात्र त्याला सुनावलेली शिक्षा अतिशय आश्चर्यकारक आहे. असं देखील यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाल न्याय मंडळाने घेतलेली भूमिका शासनाच्या आणि लोकांमध्ये निराशा करणारी आहे. या प्रकरणात पोलीस वरील कोर्टात जातील. ज्या आरोपी अल्पवयीन मुलाला मद्य दिले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई लवकरच करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हवर प्रकरणात कडक होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? BCCI घेणार MS Dhoni ची मदत; जाणून घ्या नेमकं प्रकरण
फडणवीस म्हणाले, रेसिडेन्शिअल पबवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणात आता पोलिसांसाबोत चर्चा झाली आहे. पोलीस आता ड्रंक अँड ड्राईव्हवर प्रकरणात कडक कारवाई करणार आहे. ज्या पबला लायसन्स देण्यात आले आहे त्यांच्यावर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेला देखील सूचना करण्यात आली असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.