Pune : उवसग्गहरं स्त्रोतामध्ये विश्वकल्याणाची भावना असल्याचं प्रतिपादन आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल (Shobha Dharival) यांनी केलंय. दरम्यान, जैन समाजबांधवांच्यावतीने उवसग्गहरं स्त्रोत सामूहिक पठणाचे आयोजन पुण्यातील बिबवेवाडीमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी धारीवाल बोलत होत्या.
Bigg Boss Marathi : ‘मी एकमेव आहे जी निक्किशी भांडू शकते..’, जान्हवीने सांगितले आर्याला
धारीवाल म्हणाल्या, स्वत:च्या हितासाठी केलेली प्रार्थना ही मंदिराच्या भिंतींवर आदळून माघारी येते, मात्र उवसग्गहरं स्त्रोत स्वार्थावर आधारित नसून परमार्थावर आधारित आहे. या प्रार्थनेतील एक एक परमाणु जेव्हा वायुमंडलमध्ये पसरतो तेव्हा त्यात सर्व जगाचे कल्याणच होते. वसग्गहरं स्तोत्र “महामंगलकारी स्तोत्र” असून स्त्रोताच्या नियमित स्मरणामुळे,रोगपिडा,शत्रु आदी सांसारिक दुःखपिडा दुर होतात, असं धारीवाल म्हणाल्या आहेत.
Aamir Khan : तिसऱ्या लग्नाच्या चर्चावर आमिरने सोडलं मौन? म्हणाला, ‘मी 59 वर्षांचा आहे, पण…’
तसेच मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे, म्हणूनच मागील आठ वर्षांपासून समाजबांधवांमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्यांना एकत्रितपणे जोडण्यासाठी स्तोत्राच्या आयोजनातून प्रयत्न करत आहे. यावेळी अनेक भाविक उपस्थित होते. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी बालन, शोभा धारीवाल यांच्याद्वारे पठणाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त काम आमच्या दहा वर्षात झालं; जळगावच्या सभेत मोदींचा विरोधकांवर घणाघात
यावेळी बोलताना आचार्य पद्मश्री चंदनाजी म.सा. म्हणाले, पाण्यात कंकर टाकल्यास गोल वलय तयार होतं त्याचप्रमाणे उवसग्गहरं स्त्रोत पठण केल्यास सकारात्मक वलय आपल्यात येते, त्याची प्रचिती आपल्याला मिळत असून सकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत. या कार्यक्रमासाठी बालन ग्रुपचे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन, पोपट ओसवाल, जैन संस्थानचे पदाधिकारी, दिग्गज उद्योजक धारीवाल वसतिगृहातील विद्यार्थी , गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आलं.