Download App

भिसे दाम्पत्याला मूल दत्तक घेण्याचा सल्ला देण्यात आला होता; दिनानाथ रूग्णालयाने जारी केला अहवाल

Dinanath Mangeshkar Hospital Answer On Tanisha Bhise Death Allegation : पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, (Pune News) असा आरोप केला जातोय. यावर आता रूग्णालयाच्या समितीचा (Dinanath Mangeshkar Hospital) अहवाल समोर आलंय. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या आरोपांवर उत्तर दिलंय. तनिषा भिसे (Tanisha Bhise) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आणण्यात आलं होतं. परंतु उपचारासाठी पैशांची अडवणूक करण्यात आली होती. दहा लाख रूपयांची मागणी केली होती. यामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. या घटनेमुळं संपूर्ण राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. अजित पवार गटाचे आमदार अमित गोरखे यांच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने रूग्णालय प्रशासनावर सवाल उपस्थित होत आहेत.

‘माझ्या नादाला लागू नको’, नागडा करेन; राऊतांच्या धमकीनंतर प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया समोर…

या प्रकरणी रुग्णालयाने वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, डॉ. अनुजा जोशी (वैद्रद्यकीय सुप्रिटेंडन्ट), डॉ. समीर जोग (अतिदक्षता विभाग प्रमुख) आणि सचिन व्यवहारे (प्रशासक) या तज्ञांची समिती स्थापन करून आपला अहवाल तयार केला आहे. त्यांनी रुग्णाचे जुने केस पेपर्स, सध्याचे पेपर्स, संबंधित डॉक्टर यांचे जबाब नोंदवून घेतले होते.

समितीचा अहवाल काय सांगतो?

तनिषा भिसे या 2020 पासून रूग्णालयामध्ये वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या. त्यांनी 2022 मध्ये 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया केली होती.
2023 साली त्यांना रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण अन् प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो की, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही. त्याची या रुग्णालयास माहिती नाही. मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत, असं देखील रूग्णालयाने स्पष्ट केलंय.

दीनानाथ रूग्णालयाला अवघे 1 रूपये भाडे, तरीही 10 लाखांचा हव्यास; RTI कार्यकर्ते कुभारांनी काढला कच्चाचिठ्ठा

चौकशीअंती रुग्णालयातील इतर समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे :

1.सदर रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती.
2. माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत.
3. अॅडवान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते.
रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत, तसेच वैद्रद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडवान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे, असे समितीचे मत आहे.

28 मार्च 2025 शुक्रवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते एमर्जन्सी किंवा लेबर रूममध्ये आले नव्हते. डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता निरीक्षणासाठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy व caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, 7 महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले. रुपये 10 ते 20 लाख खर्च एकंदर येऊ शकतो, याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या. मी प्रयत्न करतो असे सांगितले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्रद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा, (नातेवाईकांप्रमाणे रुपये २ ते २.५ लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले.

असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही, याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले. त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला, तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले.
डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की, रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्णाची नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले, याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.
यानंतर Daily Mirror मध्ये आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की, रुग्णाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंती मुळे मृत्यू झाला.

वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, 28 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली. 29 मार्च राजी सकाळी सिझेरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला. सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या operation ची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवली असे समजते.

 

follow us