Child Parenting : आई-बाबा मुलांसाठी फक्त 21 मिनिटे द्या! पॅरेंटिंगचा 7-7-7 ट्रेंड काय सांगतो?

What Is 7-7-7 Parenting Trend 21 Minutes For Your children : सध्याच्या बदलेल्या लाईफस्टाइलमुळे आई अन् बाबा दोघंही कामात व्यस्त असतात. अनेक पालक जॉब करतात. तर अनेकजण बिझनेसमध्ये बिझी असतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष (Parents) द्यायला, वेळच मिळत नाही. परंतु त्यामुळं मग मुलांकडे (children) दुर्लक्ष होतं…त्यांचं जडणघडण नीट होत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पालकांसाठी आहे. वेळीच सावरण्यासाठी आपल्या मुलांना रोज फक्त 21 मिनिटांचा वेळ द्यायला हवा, असा पॅरेंटिंगचा एक नवा ट्रेंड व्हायरल होतोय, या ट्रेंडमध्ये (Parenting Trend) नक्की काय…या 21 मिनिटांत नेमकं काय करायचं, ते पाहू या.
आई-वडील दोघंही वर्किंग असले की, त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. संपूर्ण दिवस कामात निघून जातो. थकून भागून घरी आल्यानंतर मुलांना हवा तसा वेळ देता येत नाही…किंवा वेळच देता येत (Parenting Tips) नाही, असं म्हणायला हकरत नाही. कारण हीच तक्रार आज प्रत्येक पालक करत आहे. आई वडिल म्हणून मुलांना नीट वेळ देत नाही, ही खंत त्यांच्या मनात असते. तुमच्या पण मनात आहे का?
मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट गुन्हा दाखल होणार; वाहतूक पोलिसांना कारवाईचे सर्व अधिकार
काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होतोय, तो पालकत्वामध्ये देखील होत आहे. साधारणपणे विचार केला तर 15 ते 20 वर्षांपूर्वी किंवा त्याच्या अगोदर पालकांची भूमिका होती, ती आता पूर्णपणे बदलली आहे. बदलत्या काळानुसार पालकत्वाचे वेगवेगळे ट्रेंड सुद्धा लोकप्रिय होत आहेत. यामध्ये होतंय काय? तर मुलांना पुरेसा वेळ देत येत नाही. त्यामुळे दिवसातील फक्त 21 मिनिटे मुलांसाठी द्यावीत, हा पॅरेंटिंगचा नवीन ट्रेंड सध्या खूपच लोकप्रिय होतोय.
‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेंची फसवणूक?, तब्बल ६१ लाखांना घातला गंडा, काय घडलं?
7-7-7 परेंटिंगचा नवीन ट्रेंड काय आहे ?
7-7-7 च्या पॅरेंटिंगच्या नव्या ट्रेंडनुसार पालकांनी दिवसातून आपल्या मुलांसाठी तीन वेळा सात-सात मिनिटांचा वेळ काढायचा आहे. पालकत्वाच्या या नियमानुसार, पालकांनी दररोज सकाळी किमान 7 मिनिटे, संध्याकाळी 7 मिनिटे आणि रात्री 7 मिनिटे मुलासोबत घालवायची आहेत. मुलांच्या विकासासाठी दिवसातील 21 मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहेत. या नियमामुळे मुलांची मानसिक अन् शारीरिक वाढ होतेच, शिवाय पालक अन् मुलांमध्ये एक स्ट्ऱॉंग बॉंडिंग सुद्धा निर्माण होते. या परेंटिंग ट्रेंडची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या नियमामध्ये रोज फक्त 21 मिनिटे मुलांना द्यायची आहेत. तु्म्ही तुमच्या मुलांसोबत घालविलेली ही 21 मिनिटे उद्या त्यांचे भविष्य घडविण्यात महत्त्वाचं योगदान देणार आहेत.
सकाळच्या सात मिनिटांत सकारात्मकता
आई-बाबांसाठी सकाळची सात मिनिटे अत्यंत महत्वाची आहेत. या सात मिनिटांमध्ये मुलांना शक्य तितके सकारात्मक विचार देणे, हे त्यांचं काम आहे. कारण याचा मुलांच्या संपूर्ण दिवसावर सकारात्मक परिणाम होतो. आई-बाबांना फक्त एवढंच करायचं आहे, की तुमचं मूल झोपेतून उठल्यानंतर थोडा वेळ त्याच्यासोबत घालवायचा आहे. त्याला मोटिवेट करून त्याच्या दिवसाची सुरूवात करा. सकाळीच आपल्या मुलासोबत दिवसभरातील प्लॅन्ससंदर्भात चर्चा केला. शाळेमध्ये खास काही घडतंय का? हे विचारा. त्याला सकाळची काम पटपट कशी आवरायची, याबद्दल काही टिप्स द्या.
संध्याकाळच्या सात मिनिटांत काळजी
त्यानंतर संध्याकाळची सात मिनिटे देखील आई-बाबा आणि मुलासाठी अत्यंत महत्वाची आहेत. या सात मिनिटांमध्ये मुलाने संपूर्ण दिवसभरात काय केलं? तुम्ही दिवसभरात काय केलं? हे एकमेकांसोबत शेअर करा. जर तुमच्या मुलाने दिवसभरात काही चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुक करा. जर त्याने काही चूक केली असेल, तर काम कसं करायला हवं? हे त्याला जवळ घेवून प्रेमाने समजावून सांगा. मुलांना रोज काहीतरी नवीन शिकवण्याची सवय लावा. पालक त्यांचे अनुभव देखील मुलांसोबत शेअर करू शकता. यामुळं विचारांची देवाण-घेवाण होते, मुलांसोबत बॉंडिंग होण्यास मदत होते.
रात्रीच्या सात मिनिटांत प्रेम
सकाळ आणि संध्याकाळनंतर रात्रीची सात मिनिटे देखील अत्यंत महत्वाची ठरतात. मुलांसोबत भावनिक बंध मजबूत करण्यासाठी रात्रीची सात मिनिटे अत्यंत खास असतात. झोपण्यापूर्वी आई-बाबा आणि मुलांमधील नातं अजून घट्ट करण्यासाठी रात्रीची सात मिनिटे खूपच महत्वाची असतात. यावेळात तुम्ही मुलांना गोष्ट सांगू शकता, दिवसभरातील चांगल्या घटना मुलांसोबत शेअर करू शकता. त्यांना मिठीत घेवून प्रेम व्यक्त करू शकता. रात्रीच्या या 7 मिनिटांमुळे मुलांच्या मनामध्ये आराम अन् शांतीची भावना निर्माण होते. त्यामुळे त्यांना चांगली झोप लागू शकते. यामुळे मुलं उद्यासाठी फ्रेश अन् चांगल्या विचारांनी प्रेरित होवून झोपतात, असा पॅरेंटिंगचा नवा ट्रेंड सांगतो.