Download App

निवडणुकीच्या तोंडावर धाडसत्र सुरूच; लवासाचे मालकही ईडीच्या रडारवर, दिल्ली, मुंबईसह गोव्यात धाडी

ED raid on Lavasa Owner : देशात सध्या एकीकडे लोकसभा निवडणुकांचं वातावरण असताना त्यातच विरोधकांवरील इडी कारवायांचं सत्र देखील जोरात सुरू आहे. त्यात आता शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या लवासा प्रकल्पाचे मालक अजय सिंह ( ED raid on Lavasa Owner ) हे देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. लवासाचे मालक सिंह यांच्या डार्विन या कंपनीसह इतर कंपन्यांवर देखील ईडीने दिल्ली, मुंबई आणि गोवा या ठिकाणच्या 9 मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

OICL Bharti 2024 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत बंपर भरती सुरू, महिन्याला 96,765 रुपये पगार

यामध्ये 80 लाखांच्या रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर डलेमन रिया-आयटी ट्रेड लिमिटेड या कायदेशीर ऑडिटिंग आणि कर सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीवर देखील धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये अजय सिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या ठिकाणांहून 78 लाख रुपये भारतीय चलन दोन लाखांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं आहे. हरिप्रसाद अकलू पासवन आणि रमेश यादव कुमार हे या कंपनीचे संचालक असून ही कंपनी लवासा विकत घेणाऱ्या डार्विनचे मालक अजयसिंह यांच्या नियंत्रणात आहे.

भावी खासदारांनो चिल्लर नको रे भो!; ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ पॅटर्नची धास्ती

तर डलेमन आणि इतरांनी वेस्टीज मार्केटिंग कंपनीच्या बँक खात्यातून फसवणूक करत 18 कोटी रुपयांची रक्कम वळती केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर ही रक्कम डार्विन ग्रुप ऑफ कंपनीच्या अनेक बँक खात्यांमध्ये तसेच अजय सिंह यांच्या सहकाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वळती केल्याचे देखील ईडीने म्हटले आहे.

त्यामुळे वेस्टीज मार्केटिंगच्या तक्रारीवरून डलेमनचे संचालक बोगस असून या सर्व गैरव्यवहाराचा फायदा अजयसिंह यांच्या कंपनीला झाला. डार्विन तिथेच कंपनी आहे. जिने 2021 मध्ये तब्बल 1,184 कोटी रुपयांच्या बोली लावत लवासा कॉर्पोरेशन विकत घेतलं होतं. सुरुवातीला दिवाळखोरीत असल्याने डार्विनला एनसीएलटीची मंजुरी नव्हती. मात्र ही मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीला लवासाचा ताबा मिळाला होता.

follow us