OICL Bharti 2024 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत बंपर भरती सुरू, महिन्याला 96,765 रुपये पगार
OICL Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आता एक चांगली संधी चालून आली आहे. ती म्हणजे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Company Limited) अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. उमेदवार 12 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा काय आहे? शैक्षणिक पात्रता काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.
हा तर लोकशाहीवर हल्ला, विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून टार्गेट; ममता बॅनर्जीचा हल्लाबोल
या भरती प्रक्रियेबाबतची अधिसूचना कंपनीने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यात या भरतीचे सर्व तपशील दिलेले आहेत. प्रशासकीय अधिकारी पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल शंभरहून अधिक रिक्त पदे भरल्या जाणार आहेत. या पद भरतीसाठी उमदेवरांना फक्त ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज करावा लागेल.
पदाचे नाव:
प्रशासकीय अधिकारी
प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 100 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यामध्ये लेखा विभागाच्या 20 पदे, ऍक्च्युअरीची 5 पदे, अभियंता 15 पदे, IT अभियंता 20 पदे, विधी 20 पदे आणि वैद्यकीय अधिकारी 20 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पंतप्रधानांवरील टीका संजय राऊतांना भोवणार ? भाजपची निवडणूक आयोगात धाव
शैक्षणिक पात्रता:
B.Com/ MBA (वित्त)/ CA/ ICWA/ पदवी (सांख्यिकी/ गणित/ एक्चुरियल सायन्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट (सांख्यिकी/ गणित/ एक्चुरियल सायन्स) किंवा B.E./ B.Tech/ M.E./ M.Tech (माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ केमिकल/ पॉवर/ औद्योगिक/ इन्स्ट्रुमेंटेशन) 60% गुणांसह, किंवा 60% गुणांसह MCA किंवा MBBS/ BDS किंवा LLB.
वयोमर्यादा –
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 31 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत 21 ते 30 वर्षे या दरम्यान असावे. महत्वाचं म्हणजे, मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.
SC/ST – 05 वर्षे सूट,
OBC – 03 वर्षे सूट,
अर्ज फी
ओपन/EWS/OBC – रु 1000
SC/ST/PWD – रु 250
नोकरीचे ठिकाण-
संपूर्ण भारतभर
वेतनमान-
रु. 50,925 ते रु. 96,765
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन परीक्षा – मे/जून 2024
अर्ज सादर करण्याचाची अंतिम तारीख – 12 एप्रिल 2024
अर्ज सुरू होण्याची तारीक – 21 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ-
https://orientalinsurance.org.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/toiclaojan24/