Download App

आता लोकांना कळेल हु इज धंगेकर; धंगेकरांच्या प्रवेशानंतर शिंदेंनी लगावला टोला

Eknath Shinde on Ravindra Dhangekar Entry in Shivsena : कसबा पोट निवडणुकीतील विजयाचा धंगेकर पॅटर्न गाजवणारे धंगेकरांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला आहे. आज त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश पार पडला. त्यावेळी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना कळेल हु इज धंगेकर असं म्हणत मिश्किल टोला लगावला आहे.

VIDEO : ‘तुला सोडणार नाही…’ संदीप क्षीरसागर यांचा नायब तहसीलदारांना दम, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

यावेळी शिवसेना उपनेते डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. तर शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर सामान्य लोकांचे काम करतो कोणाला प्लंबर गॅस रिपेअर वाला सगळं हवा असेल तर गाडीवर बसून पाठवतो सामान्य माणसाला कशी मदत करायची याची सगळी माहिती आम्हाला तुमच्याबद्दल मिळाली आता तुम्ही शिवसेनेमध्ये आला आहात. त्यामुळे लोकांना कळेल हु इज धंगेकर असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टोला लगावला आहे.

मंत्री जयकुमार गोरेंचे कारनामे चव्हाट्यावर आणले, पत्रकार तुषार खरात यांना अटक

तसेच यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. लोक म्हणतात आम्ही बाळासाहेबांच्या जुन्या कॅसेट जपून ठेवल्यात त्या कॅसेट जपून ठेवण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपून ठेवले असते तर लोक कुठे गेली नसती. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला लोकांनी हलक्यात घेतलं. त्यानंतर जे घडलं त्याची देशाने नाही तर जगातील ३३ देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिले. शिवसेनेकडून ८० पैकी ६० आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले.

तुम्ही सकाळी म्हणालात काँग्रेस सोडताना दुःख होतंय पण थोड्या दिवसांनी तुम्हाला वाटेल की शिवसेनेत उशिरा आलो याचं दुःख आहे. पुण्यामध्ये मोठी टीम तयार करा. तुम्हाला कधीही दुःख वाटणार नाही की आपण शिवसेनेमध्ये का आलो. तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना ४ लाख ६० हजार मते मिळाली. यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते, अशा शब्दांत शिंदे यांनी धंगेकर यांचे कौतुक केले.

follow us