Download App

पुण्यात राष्ट्रवादीच्या मोठ्या हालचाली; इच्छुकांच्या चाचपणीसाठी मागवलेत अर्ज

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत आहेत, असे प्रशांत जगताप म्हणाले.

Sharad Pawar : विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तसा शरद पवारांचा (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस चांगलाच अॅक्टिव्ह झाला आहे. शरद पवारांनी आत पुणे जिल्ह्याचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला थांबवायचं याचं गणित वरिेष्ठांच्या डोक्यात घोळत आहे. मात्र त्याआधी इच्छुकांची चाचपणी करण्याचं काम राष्ट्रवादीकडून होणार आहे. त्यासाठी आता पक्षाने सर्व इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे. शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले. पक्षाचे संघटन व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या पाहता अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पंढरपूरात शरद पवार गटाला मिळणार बळ, भगीरथ भालके करणार लवकरच घरवापसी?

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले आहे.

 

follow us