Download App

मोठी बातमी, पुण्यात ठाकरेंना धक्का, माजी आमदार महादेव बाबर सोडणार साथ

Mahadev Babar : पुढील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून यापूर्वी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील अनेक

  • Written By: Last Updated:

Mahadev Babar : पुढील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून यापूर्वी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील अनेक नेते पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. यातच पुण्यातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह निलेश मगर, योगेश सासणे आणि अनेक शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. उपनगरात शिवसेनेची ताकद म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार महादेव बाबर पक्षावर नाराज होते.

विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने महादेव बाबर पक्षावर नाराज होते. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांना महादेव बाबर गैरहजर राहिल्याने ते लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. तर आता माजी आमदार महादेव बाबर शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटातील नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे राहिल्याचे दिसून येत आहे.

महादेव बाबर यांचा राजकीय प्रवास

महादेव बाबर 1997 मध्ये ते पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडले गेले. त्यानंतर 2002 मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडले गेले. महादेव बाबर यांनी 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली या निवडणुकीत महादेव बाबर यांचा विजय झाला होता. महादेव बाबर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत शिवरकर यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता. महादेव बाबर यांना 65 हजार 517 इतके मतं मिळाली होती.

मोर्चा काढला, आता दोन दिवसात मोठा बॉम्ब फोडणार; जलील यांचा मंत्री शिरसाटांना इशारा

त्यानंतर 2014 साली भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मोदी लाटेत महादेव बाबर यांचा भाजपचे योगेश टिळेकर यांनी 30 हजार मतांनी पराभव केला होता.

follow us