Download App

Pune Cyber Crime : ‘मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध पडला महागात, तरुणीला घातला लाखोंचा गंडा

Fraud With Girl on Matrimonial site : पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन म्हणजेच मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध घेत असाल तर सावधान. कारण पुण्यामध्ये एका तरूणीला ‘मॅट्रिमोनियल’ साईटवर भावी पतीचा शोध महागात पडले आहे. तिला या प्रकरणात तब्बल 8 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

अतिक अहमदची हत्या अन् लॉरेन्स बिन्शोई गँगचे कनेक्शन उघड; हल्लेखोरांची NIA समोर कबुली

एका ‘मॅट्रिमोनियल’ साईटवर या 33 वर्षीय विवाहेच्छुक तरूणीने पती शोधण्यासाठी नोंदणी केली होती. यावेळी या तरूणीच्या संपर्कात एक भामटा आला होती. गेल्या 2 महिन्यांपासून ही तरूणी या भामट्याच्या संपर्कात होती. आपण युकेमध्ये स्थायिक असल्याची खोटी माहिती या तरूणाने दिली होती. त्यामुळे या तरूणीने या तरूणाशी विवाहाच्या उद्देश्याने संपर्क साधला.

RCBच्या पराभवानंतर नवीन-उल-हकने डिवचले; सोशल मीडियावर भिडले विराटचे चाहते

त्यानंतर त्यांनी आपली वैयक्तिक माहिती शेअर केली. तसेच कुटुंबांची माहिती घेतली. दरम्यान, आरोपी तरुणाने 1 मे रोजी सिंगापूरला मिटिंगसाठी जात असल्याचे सांगत तिला आणि तिच्या कुटुंबाला भेटत असल्याचे त्याने सांगितले. त्याने यावेळी आधी आपले सामान या तरूणीच्या पत्त्यावर पाठवले. त्याने तिला या बॅगा आणि कुरीयरची पावती पाठवली होती.

‘…तर देशात निवडणुका होणार नाहीत’; मलिक यांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

मात्र काही वेळानंतर तिला सीमा शुल्क आकारण्याची मागणी करणारा कॉल आला. तिने 58 हजार रूपये भरले. मात्र मौल्यवान सामान असल्याने अधिक पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले. या मौल्यवान वस्तू आपण आपल्या कॅन्सरग्रस्त बहिणीसाठी पाठवल्या आहेत असं सांगितलं. त्यामुळे तरूणाने या तरूणीकडून तब्बल 7 लाख 98 हजार रूपये उकळले.

दरम्यान आपली फसवणुक होत असल्याचं लक्षात येताचं या तरूणीने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता कलमांतर्गत फसवणूक आणि गुन्हेगारीचा गुन्हा दाखल केला आहे.

follow us