‘…तर देशात निवडणुका होणार नाहीत’; मलिक यांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

‘…तर देशात निवडणुका होणार नाहीत’; मलिक यांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

Satyapal Mallik On PM Modi :  जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्याबाबत मलिक यांनी पुन्हा एकदा सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की 2019 ची लोकसभा निवडणूक शहीद जवानांच्या मृतदेहांवर लढली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली असती तर गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता, असेही सत्यपाल मलिक म्हणाले. मलिक पुढे म्हणाले की, जर पुढच्या निवडणुकीपर्यंत जनतेने त्यांच्या विरोधात मतदान केले नाही तर ते जनतेला मतदान करण्यास पात्र सोडणार नाहीत.

Video : मोदींच्या ‘या’ वक्तव्याने झाला होता हंगामा

ते म्हणतील की आम्हीच निवडणूक जिंकतो, मग निवडणुका घेण्याची काय गरज आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही न्यायालये नसतील, सैन्य नसेल, सिस्टीम नसेल आणि कोणतीही यंत्रणा नसेल, असे ते म्हणाले आहेत.

सत्यपाल मलिक म्हणाले की, या लोकांना मला देशद्रोही म्हणायचे आहे. मात्र मी प्रामाणिकपणे काम केले आहे. ते म्हणाले की, आता मला अडकवता येणार नाही, त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई करण्यात आली आहे. सरकारवर आरोप करताना मलिक म्हणाले की, मला तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

Wrestlers Protest : ‘नार्को टेस्ट करायला तयार पण…,’ बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटुंना घातली अट

यापूर्वी सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापा टाकला होता. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 17 मे रोजी सीबीआयने एकूण 8 ठिकाणी छापे टाकले. ज्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले त्यात सत्यपाल मलिक यांच्या मीडिया सल्लागाराचाही समावेश आहे. सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना ते माध्यम सल्लागार होते. माहिती देताना एका तपास अधिकाऱ्याने सांगितले होते की, हे प्रकरण कथित विमा घोटाळ्याशी संबंधित आहे आणि ज्या आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले ते जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि राजस्थानमध्ये आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube