Hadapsar Assembly Constituency: हडपसर विधानसभा मतदारसंघातून (Hadapsar Assembly Constituency) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार) उमेदवार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करत रॅलीत सहभागी झाले होते.
राज ठाकरेंसाठी चर्चेची दारं खुली आहेत का? संभाजीराजे छत्रपती म्हणाले, अजेंडा सारखाच पण…,
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सुरेश घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, रंजना टिळेकर, नंदा लोणकर, विजया कापरे, शिवाजी पवार, सुरेखा कवडे, फारूक इनामदार, मारुती आबा तुपे, विकास रासकर, डॉ. शंतनू जगदाळे, अभिमन्यू भानगिरे, संदीप दळवी, रवी तुपे, हसीना इनामदार व महायुतीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
Video : एक-दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती; फडणवीसांच्या विधानानंतर मुळीक समर्थकांमध्ये उत्साह
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चेतन तुपे यांनी सकाळी कै. विठ्ठल तुपे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रॅली हडपसर येथील साने गुरुजी भवन येथून निघाली. या रॅलीत राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप व शिवसेनेचे (शिंदे) पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मंडई व पुणे सोलापूर मार्गावरून पुढे जात साने गुरुजी नाट्यगृहाकडे गेली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
चेतन तुपे यांनी म्हणाले की, राष्ट्रवादीने सलग दुसऱ्यांदा विश्वास दाखविल्याबद्दल पक्षाचे आभार मानतो. तसेच लोकसभा निवडणुकीत हडपसरकर जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यामुळे आजच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून हडपसर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.
आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, हडपसरच्या जनतेने महायुतीवर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. हडपसरचे आमदार म्हणून चेतन तुपे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे हडपसरची जनता समाधानी आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. अलीकडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला राहिला आहे. चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महाराष्ट्रातील बदलती राजकीय घडामोडी आणि पुण्यासारख्या शहरी केंद्रांवर आपली पकड कायम ठेवण्याची राष्ट्रवादीची आकांक्षा पाहता चेतन तुपे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.