Download App

भुजबळांनी आम्हाला चार पैसे देऊन मोर्चा काढायला सांगायला हवे होते; हरिभाऊ राठोडांचे वादग्रस्त विधान

  • Written By: Last Updated:

Haribhau Rathod On Chhagan Bhujbal : पुणेः माजी खासदार व ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod ) यांनी पुण्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांचा जोरदार समाचार घेतला आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन मैदानात यायला पाहिजे होते. आता ते ट्रोल होत आहेत. त्यांनी स्वतःच कुऱ्हाड पायावर पाडून घेतली आहे. ते मंत्री आहेत. त्यांनी आम्हाला चार पैसे देऊन मोर्चा काढायला सांगायला हवे होते, असे वादग्रस्त विधान हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

Animal Event: ‘मुंबईचे दिवस गेले, हैदराबादला या! तेलंगणाच्या नेत्याची रणबीर कपूरला ऑफर

राठोड यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. राठोड म्हणाले, मराठा व ओबीसींमधील वाद सांमजस्याने सोडायला हवा होता. ओबीसी नेत्यांचे मेळावे, भाषणे कोणालाच आवडले नाहीत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. माझी विनंती आहे की छगन भुजबळांनी डोके शांत ठेवावे. त्यांना उर्वरित आयुष्यात शांतेत, समाधानात जगायचे आहे. भुजबळांनी टेन्शन घेऊ नये, तुमच्या मागे ओबीसी समाज आहे. भुजबळापेक्षा मी मोठ्या ओबीसीच्या सभा घेऊ शकतो. मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटे पडले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत, असेही राठोड म्हणाले.

Sambhajiraje Chhatrapati : 25 राज्यांत 50 % पेक्षा जास्त आरक्षण मग महाराष्ट्रात का नाही? संभाजीराजेंचा सवाल

सरकार ओबीसींना घाबरत आहे. सरकारने ओबीसीची भिती बाळगू नये.आजही खूप लोकांना आरक्षण काय आहे ते कळतं नाही. ओबीसी नेत्यांनी संयमाची भाषा वापरली पाहिजेत. मराठा नेते संयमी आहेत. गरजवंत मराठा समाजाला आरक्षण पाहिजेत, बाकीच्या मराठ्यांना नको आहे. त्यामुळे ते बोलत नाहीत आणि त्यांना वाटत आरक्षण मिळायला नको, असा आरोपही राठोड यांनी केला आहे.


चार-पाच हजार दिले की लगेच कुणबी दाखला, राठोडांचा दावा

सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण देता येईल. 70% मराठा समाजाने आधीच कुणबी प्रमाणपत्र घेतले आहे हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. ज्यांच्याकडे दाखल नाहीत. त्यांना किती पैसे लागतातत. चार-पाच हजार रुपयांत तहसीलदार कुणबी प्रमाणपत्र देतो. क्लार्क, शिपायाला पैसे दिले की तुमच्या हातात दाखला दिला जातो. दाखल्यांना ब्रिटिश काळाचा पुरावा लागत नसल्याचा दावाही हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

Tags

follow us