House sales in Pune have decreased? What exactly is the Gera Developers report : सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात स्वत:चं घर घेण हे एक स्वप्न असतच. त्यातही ते कोणत्या शहरात असावं? हे ही आपलं ठरलेलं असतं आणि विशेषत: पुण्यामध्ये घर घेणं हे स्वप्न तर आपल्या पैकी अनेकांचं असेलच. त्यामुळे घरांच्या किंमती, घरांच्या लॉटरी अशा गोष्टी म्हटलं की, आपण आवर्जून पाहतो, ऐकतो हा रिपोर्ट देखील त्याच संबंधी आहे. कारण पुणे या सर्वांच्या स्वप्नातील शहरात अचानक घरांच्या विक्रीत घट झाली आहे. यामागील कारणं काय? गेरा डेव्हलपर्सचा अहवाल नेमकं काय सांगतो? जाणून घेऊ सविस्तर…
गेरा डेव्हलपर्सचा अहवाल नेमका काय?
गेरा डेव्हलपर्सचा ही कंपनी गेल्या कित्येक वर्षांपासून रिअर इस्टेट क्षेत्रातील वर्ष भराच्या चढ-उतार त्यामागील कारणं यांचा आढावा घेणारा अहवाल सादर करते. यातून वर्षभर रिअल इस्टेट क्षेत्रात काय-काय घडामोडी घडल्या? यातून बांधकाम व्यवसाय आणि घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य डेटा निर्माण केला जातो. जेणे करून त्यांना घर खरेदी-विक्रीबाबत योग्य निर्णय घेता येईल.
अभियांत्रिकीच्या 113 शाखांमधील करिअरच्या संधी : के. टी. जाधव
आता पाहुयात यंदाचा गेरा डेव्हलपर्सचा अहवालात नेमकं काय सागितलं आहे? या अहवालनुसार पुण्यामध्ये घरांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुण्यामधील घरांची विक्री 8% घट झाली आहे. जून 2023 मध्ये 93 हजार जास्त घर विकली गेली होती यावर्षी त्या 86 हजार सहाशे 66 विकले गेले आहेत. तसेच ही घट बाराशे स्क्वेअर फुट पेक्षा कमी आकाराच्या फ्लॅटमध्ये झाली आहे. असं या अहवालामध्ये म्हटलं आहे.
अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन; न्युमोनियाशी झुंज अपयशी
यामागील कारणं सागंताना या अहवालामध्ये म्हटलं आहे की, पुण्यामध्ये घरांच्या किमती सात टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुण्यासारख्या शहराच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीवरून घरांच्या विक्रीमध्ये घट का झाली आहे? असा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर या अहवालात सांगण्यात आलं आहे की, पुण्यातील घरांच्या विक्रीमध्ये घट होण्याचे पहिलं कारण आहे. गेल्या चार वर्षात पुण्यातील घरांच्या किंमती या 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर घरांचे आकार देखील 25 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या उत्पन्नामध्ये 40 टक्क्यांनी वाढ झालेली नाही. त्यामुळे त्यांना घरं घेणं परवडत नाही. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती दुकानात गेल्यानंतर वस्तूवरील किंमत बघून चकित होतो. त्याचप्रमाणे पुण्यातील घरांच्या किंमती ऐकून अनेकदा घर न घेण्याचा निर्णय घेतला जातो. ज्याला स्टिकर शॉक इम्पॅक्ट म्हटलं जातं.
दुसरीकडे त्यापेक्षा जास्त आकाराच्या फ्लॅटच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. ही विक्री 13 टक्क्यांवर गेली आहे. मात्र आता ज्या व्यवसायिकांचे 1200 स्क्वेअर फुट आणि त्यापेक्षा कमी आकाराची घरं विक्रीसाठी आहेत. त्यांच्यासोमोर यक्षप्रश्न उभा आहे. त्यासाठी त्यांनी ऑफर देऊन किंवा
ऑकेजन पाहुन ही विक्री करणे गरजेचे आहे. जसे की, सण समारंभांच्या काळात विशेष मुहुर्तांवर लोकांकडून घरांची खरेदी केली जाते.