अभियांत्रिकीच्या 113 शाखांमधील करिअरच्या संधी : के. टी. जाधव

  • Written By: Published:
अभियांत्रिकीच्या 113 शाखांमधील करिअरच्या संधी : के. टी. जाधव

Career opportunities in 113 branches of engineering:बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात चांगले करिअर घडविण्यासाठी फायदेशीर ठरतात म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. बारावीनंतर अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रथम क्रमांकाची पसंती देतात. अभियांत्रिकी क्षेत्रात होणाऱ्या सातत्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान विकासामुळे नवनवीन अभियांत्रिकी शाखा उद्ययास येत असतात. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध शाखांची माहिती करून घेणे आणि शाखांतील संधीचा शोध घेणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करुन अभियांत्रिकी शाखेची निवड केली तर भविष्यात चांगले करिअर घडविण्यासाठी मदत होते. आत्ता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की, या पुढील काळात अभियांत्रिकीचा कोणता अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरेल आणि कोणते महाविद्यालय निवडावे, जेणेकरून भविष्यात करिअरच्या उत्तम संधी मिळतील. अभियांत्रिकीची शाखा निवडताना विद्यार्थी ठराविक शाखांचा विचार करतात उदाहरणार्थ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इन्फॉर्मेशन Technology,मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, केमिकल इंजिनिअरिंग या ठराविक शाखांचा विचार करतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आपल्या राज्यात 113 हून अधिक शाखा आहेत, या शाखांमध्येही करिअरच्या आणि नोकरीच्या भरपूर संधी असतात. सध्याच्या काळात Artificial Intelligence, Data Science, Robotics & Automation, Machine Learning, सायबर security, Mechatronics अशा अनेक शाखातून चांगले करियर होऊ शकते.

अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करणे सोपे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता आपली आवड, क्षमता याचा विचार करून पदवीनंतर पुढे आणखी शिक्षण घ्यायचे की नोकरी करायची आहे, अशा सगळ्यांचा योग्य विचार करून अभियांत्रिकी शाखा निवडावी. महाविद्यालय निवडताना त्या त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली माहिती वाचावी आणि तपासून पाहावी ज्यामध्ये त्या कॉलेजचे affiliation, NBA accreditation, NAAC accreditation, autonomous status, पायाभूत सुविधा, प्राध्यापक वर्ग, कॅम्पससाठी तयारी करून घेणारे ट्रेनिंग प्रोग्राम, कँपस निवडीसाठी येणाऱ्या कंपन्या, त्यातून मिळणाऱ्या नोकऱ्या यांची माहिती घ्यावी. शक्य असेल तर त्या महाविद्यालयास भेट देऊन तेथील प्राध्यापकांशी चर्चा करावी किंवा तेथे सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलावे. या सर्व गोष्टी तूमच्या कॉलेजच्या निवडीसाठी फायद्याच्या ठरू शकतात. राज्यात 342 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. ते कॅप राउंडमध्ये सहभागी होतात.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र विभागांतर्गत असणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमा, engineering, Pharmacy, आर्किटेक्चर आणि इतर शाखांच्या प्रवेशांची प्रक्रिया राबविली जाते. याविषयीची संबंधित सर्व माहिती www.dtemaharashtra@gov.in किंवा cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नुकतीच तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रोसेस complete करून प्रेफरन्स फॉर्म भरायचा असतो. या वर्षी CAP राऊंडच्या 4 फेऱ्या असतील. विद्यार्थ्यांना स्वत:च्या पसंतीचं महाविद्यालय व शाखा मिळेपर्यंत पुढच्या फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी असते. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये हवे ते महाविद्यालय किंवा शाखा मिळाली नाही तरी निराश होण्याची गरज नाही. पुढच्या फेरीमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचाही निकाल जाहीर झाला आहे. यात राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. या वर्षी बोर्डाचा निकाल गत वर्षीपेक्षा 2 टक्क्यांनी कमी लागला आहे. दरम्यान, अभियांत्रिकीच्या MH CET चाही निकाल लागला आहे. या परीक्षेमध्ये 2,95,577 विद्यार्थ्यानी PCM ग्रुपमधून examination दिली होती. आता जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, ज्याना चांगले मार्क्स आणि percentile मिळाले आहे त्यांच्यासाठी मात्र, करिअरच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रश्न तयार झाले आहेत. तुम्हाला बारावीनंतर पुढे कोणता करिअर ऑप्शन निवडावा यासाठी काही पर्याय आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता. प्रवेशा पूर्वी या शाखांची माहिती घेणे गरजेचे आहे. सुमारे 113 पेक्षा जास्त अभियांत्रिकीच्या शाखा आहेत. महत्त्वाच्या अभियांत्रिकी शाखांची माहिती जाणून घेऊया…


Computer Engineering:
अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेमध्ये संगणक अभियांत्रिकीची माहिती गरजेचं असते. या शाखेमध्ये हार्डवेअर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, मोबाइल टेक्नॉलॉजी, प्रोग्रागिंम लँग्वेजेस, कॉम्प्युटर असेंब्ली, इंटरनेट टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ग्राफिक्स, डिझाइन, अॅनिमेशन इंजिनिअरिंग, Artificial Intelligence, डाटा सायन्स, सायबर security या विषयांचा अंतर्भाव असतो. माहिती तंत्रज्ञानामुळे बायोइन्फर्मेटिक्स, रिमोट Sensing, अॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी अश्या अनेक विद्याशाखा उदयास येत आहेत. Computer Engineering आणि Information Technology या दोन शाखांच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नसल्याने त्यातली कोणतीही शाखा तुम्ही निवडू शकता. संगणक अभियंत्यांना नेटवर्क, पायाभूत सुविधा आणि संगणक प्रणाली तयार करणे, कंपनीचा डेटाबेस सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवणे, अनेक ऑपरेटिंग सिस्टम, सॉफ्टवेअर आणि संगणक प्रोग्रामसाठी कोड तयार करणे, संगणक प्रणालीचे आर्किटेक्चर आणि इंटरफेस डिझाइन करणे, व्यवसायासाठी संशोधन प्रकल्पांचे समन्वय, सर्वेक्षण, संकलन, रेकॉर्डिंग आणि डेटाचे विश्लेषण करणे यांची जबाबदारी असते.

Artificial Intelligence: भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यात छोट्या कामात या एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच एआय हा मानवी जीवनाचा एक भाग बनेल. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन, कॉम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीनमार्फत केले जाऊ शकते. जर तुम्ही आयटी क्षेत्रातील नवीन क्षेत्रात करिअरचा मार्ग शोधत असाल, तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करुन तुमचे भविष्य उज्ज्वल करु शकता. भविष्यात या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. तसेच या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या उत्तम संधी आहेत. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भविष्यात सुमारे 33 टक्के अधिक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील.


Data Science:
एखाद्या व्यवसाय अथवा ऍप्लिकेशन वा इंटरनेट चालू असताना तयार होत जाणाऱ्या माहितीचा वापर करून त्या व्यवसायास अथवा ऍप्लिकेशनला वृद्धिंगत करणे म्हणजे डेटा सायन्स. डेटा सायंटिस्टची गरज सर्वच क्षेत्रात आहे आणि असणार आहे. औषधनिर्मिती उद्योगात औषधाची परिणामकारकता व बँका त्यांची क्रेडिट रिस्क ठरवण्यासाठी गेली चाळीस वर्षे डेटा सायन्सचा वापर करत आहेत. वर्तमान काळात, ई-व्यवहारची चलती आहे. यामध्ये सर्वच क्षेत्रात डेटा सायन्स वापरले जाते. तसेच भविष्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स अतिशय महत्वाचे आहे.


Cyber Security:
आपण आज आधुनिक युगात आहोत, जिथे पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन उपकरण यांच्यात वाढ होत आहे. त्यामुळे सायबरसुरक्षेचे महत्व ही वाढले आहे. सायबर सुरक्षा म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटा यांसारख्या इंटरनेट-कनेक्टेड सिस्टमचे सायबर धोक्यांपासून संरक्षण करते. संगणक, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यांचा समावेश होतो. आपल्या जीवनात काही गोष्टी संवेदनशील असतात, त्या गोपनीय माहितीची सुरक्षा व्हावी म्हणून सायबरसुरक्षा असणे गरजेचे आहे. आताच्या जगात आपण सर्व इंटरनेटचा वापर करतो. त्यामुळे सध्याच्या घडीला सायबर सुरक्षा ही प्रत्येकाची गरज आहे. आरोग्यसेवा, छोटे व्यवसाय, सरकारी संस्था, उत्पादन, वित्तीय संस्था, शिक्षण यांनाही आपला डेटा गोपनीय ठेवण्यासाठी सायबर सुरक्षेची गरज लागते.

Machine Learning: मशीन लर्निंग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक भाग असून प्रोग्रॅमिंगचे एक आधुनिक तंत्र आहे, ज्याद्वारे संगणक प्रोग्राम्स नवीन गोष्टींचा स्वतःहून अभ्यास करायला शिकतात आणि आवश्यकतेनुसार स्वतःहून निर्णय घेऊ शकतात. बऱ्याश्या मोठ्या कंपन्या म्हणजे OpenAI (ChatGPT), Google Brain, Facebook, Amazon, Microsoft यांनी मशीन लर्निंग याचा सर्वात जास्त उपयोग करून बरेचसे सॉफ्टवेअरस बनवले. बरीशी लोक विचार करतात की संगणक किंवा सॉफ्टवेअर कधीही मानवासारखा विचार करू शकत नाही त्यांचे कम्प्युटेशनल एनालिसिस आणि अल्गॉरिथ्म हे माणसाशी कधीही जोडू शकत नाही. मात्र मशीन लर्निंगमुळे हे सगळे सिद्ध झाले आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या या जगात Machine learning एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपासून ते आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक शोधण्यापर्यंत, मशीन लर्निंग अल्गोरिदम आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक पैलूंना शक्ती देत आहेत.


Electronics and Telecommunication Engineering:
इंजिनिअरिंग- माहिती, तंत्रज्ञानाच्या या युगात सर्वात झपाट्याने वाढवणारी अभियांत्रिकीची शाखा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड Telecommunication. लिनिअर इंटिग्रेटेड सर्किट्स, सॅटेलाइट कम्युनिकेशन, रोबोटिक्स, मायक्रोप्रोसेसर या प्रमुख विषयांचा अभ्यास या शाखांमध्ये केला जातो. आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असणारी शाखा, यामधे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, व्हिडिओ Engineering, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड पॉवर अश्या शाखांचा विकास या क्षेत्रात झाला आहे.

Civil Engineering :
या अभियांत्रिकी शाखेमध्ये पर्यावरणाची रचना, चाचणी, बांधकाम आणि देखभाल या गोष्टींचा समावेश केला जातो. या मध्ये रस्ते, पूल आणि कालवे, ऊर्जा आणि नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद देण्याचे प्रकल्प सुद्धा समाविष्ट आहे. ही शाखा प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रे व मनुष्यबळ, बांधकामाचे सर्वेक्षण, नियम, बांधकाम नियोजन, रेखाटन, मंजुरी, संरचना, संचालन, व्यवस्थापन, मूल्यांकन, मोजमाप, देखभाल, दुरुस्ती अनेक विषयांचा अभ्यास या शाखेमध्ये करण्यात येतो. या क्षेत्रात मध्ये इमारती, रस्ता, लोहमार्ग, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, सांडपाणी योजना, धरणे व जलस्रोतच्या निर्मिती व उभारणीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेचे मोलाचे कार्य असते. शहर विकास व शहर नियोजनामध्येही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.

Mechanical Engineering:
यंत्र व उपकरणांसंबंधीचा सखोल अभ्यास या शाखेत केला जातो. यांत्रिकीकरणाच्या आणि manufacturing च्या प्रक्रियेत ही शाखा महत्त्वाची भूमिका बजावत असते. संशोधन आणि डिझाइनपासून ते स्थापनेपर्यंत आणि कमिशनिंगपर्यंत असणाऱ्या product development च्या सर्व टप्प्यांवर काम करणारी ही एक शाखा आहे. यंत्र व उपकरणासंबंधीचे ड्रॉइंगस, सुटे भाग निर्मिती, यंत्र उभारणी, हाताळणी, देखभाल व दुरुस्ती या बाबींच्या अभ्यासासह यंत्र संरचना यावर विशेष भर या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. यंत्र संरचना, निर्मिती तंत्रज्ञान, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग, थर्मोडायनामिक्स, पॉवर इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल automation, automobile, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी इत्यादी क्षेत्रात काम करू शकतात.

Electrical Engineering:
सध्याच्या काळात इलेक्ट्रिक vehiclesची मागणी खूप वाढली आहे. या emerging technology मध्ये इलेक्ट्रिक engineers ची मोठी मागणी आहे. इलेक्ट्रिकल अभियंते वस्तूचे उत्पादने, इलेक्ट्रिकल सिस्टमचे संशोधन, डिझाइन आणि चाचणी करतात. बांधकाम आणि सेवा, वाहतूक, उत्पादन, रोबोटिक्स, दूरसंचार, ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान यासह अनेक उद्योग आणि क्षेत्रामध्ये समाविष्ट होऊ शकतात. ऊर्जा शोध, वीजनिर्मिती, वीज वापर, वितरण, नियंत्रण, केंद्र उभारणी, व्यवस्थापन, रूपांतरण संरचना या विद्युतविषयक बाबींचा यात समावेश आहे. रेखाटन, विद्युत प्रवाह मोजणी, विद्युत उपकरण निर्मिती, सुरक्षा व्यवस्थापन इत्यादी विषयदेखील विद्युत अभियांत्रिकीमध्ये समाविष्ट असतात.


Chemical Engineering:
आजच्या काळात पेट्रोलियम, पेट्रोकेमिक, पॉलिमर, प्लास्टिक, बायोकेमिकल आणि बायोटेक्नॉलॉजी ही क्षेत्र आघाडीवर आहेत. ही सर्वच क्षेत्रे केमिकल इंजिनिअरिंगची निगडित आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे उत्पादन व निर्मिती असो की सर्व प्रकारचे औषधे, साबण, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एलपीजी, गॅस, अल्कोहोल, खते, कीटकनाशके, पेंट्स, ग्रीस, कपडे, कागद, रबर, फायबर, प्लास्टिकच्या वस्तू, टूथपेस्ट, परफ्युम्स, इत्यादी वस्तू . केमिकल इंजिनिअरिंगच्या साह्याने तयार होते. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. भारतातील मोठमोठ्या कंपन्या उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान लिव्हर, ओएनजीसी, ऑइल इंडिया लिमिटेड, आयपीसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, केमटॅक्स, रनबॅक्सी, एल अँड टी, कॅडबरी, ब्रिटानिया, नेरोलॅक पेंट्स, सुदर्शन केमिकल्स, दीपक नायट्रेट, एक्सेल इंडस्ट्रीज, फिनोलेक्स लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये केमिकल इंजिनियर्सना प्रचंड मोठी मागणी आहे.

याशिवाय Semiconductor Engineering, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, aerospace इंजिनिअरिंग, Robotics & Automation Engineering, Automobile इंजिनिअरिंग, Instrumentation इंजिनिअरिंग, Environmental इंजिनिअरिंग, Agricultural इंजिनिअरिंग, Biotechnology, Biomedical इंजिनिअरिंग, प्लास्टिक इंजिनिअरिंग, पॉलिमर इंजिनिअरिंग, टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, प्रिंटींग टेक्नॉलॉजी, फायर इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, Nano टेक्नॉलॉजी अश्या अनेक शाखा अभियांत्रिकीमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या उपशाखांचा विस्तारदेखील फार झपाट्याने होत आहे व त्यातून रोजगार, स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. अश्या प्रकारे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असल्यामुळे भविष्यातदेखील नवनवीन विद्याशाखांचा विकास व विस्तार असाच अधिक जोमाने होईल. विद्याशाखांची परस्परांमध्ये मिक्स होऊन interdisciplinary कोर्स तयार होतील. अशा या होणाऱ्या बदलांकडे अतिशय जागरूकतेने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच आपण योग्य अभियांत्रिकीच्या शाखेची निवड करून चांगले भविष्य घडवू शकतो.

ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीनंतर MBA किंवा UPSC, MPSC या सारख्या स्पर्धा परीक्षांकडे वळायचे आहे. त्यांना कोणतीही शाखा किंवा कोणतेही महाविद्यालय निवडले तरी फारसा फरक पडत नाही, कारण त्या ठिकाणी मुख्यत्वे पदवी मिळवलेली असणे यालाच महत्त्व असते. ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरी करायची आहे त्यांनी अशा महाविद्यालयाची निवड काळजीपूर्वक करायची आहे ज्या महाविद्यालयामध्ये गेल्या काही वर्षांपासून कँपस निवडीसाठी चांगल्या कंपन्या येत आहेत. पर्यायाने भरपूर नोकऱ्या मिळत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पुढे तांत्रिक विषयातच भारतात वा परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी आवडत्या अभियांत्रिकी शाखेची निवड करणे जास्त महत्त्वाचे आहे. भविष्यात अभियांत्रिकीच्या अश्या सर्वच शाखांना उत्तम वाव आहे, मात्र तो अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे जे अभियांत्रिकीच्या पहिल्या सत्रापासून सातत्याने प्रथम वर्गात उत्तीर्ण होतात, कारण कंपन्या जेव्हा महाविद्यालयात कॅम्पस निवडीसाठी येतात त्या वेळी विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावताना सर्व सत्रांमध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण हा नियम लावतात. अभियांत्रिकीच्या चारही वर्षांत विद्यार्थ्यांनी गंभीरतेने आणि मन लावून अभ्यास केला तर खूप चांगले यश प्राप्त करू शकतो आणि आपल्या पालकांची स्वप्नं पूर्ण करू शकतो.


डॉ. के. टी. जाधव

डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या