अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन; न्युमोनियाशी झुंज अपयशी

Actor and producer Dheeraj Kumar passes away at the age of 80; battle with pneumonia fails : बॉलीवूड आणि टेलिव्हिजनच्या जगतातील एक प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं आहे. त्यांना न्युमोनिया आजार झाला होता. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयू विभागामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते 79 वर्षांचे होते.
पक्षात दिवाळी अन् माझ्या घरात अंधार; राज ठाकरेंचे ज्येष्ठ सहकारी प्रकाश महाजनांना अश्रू अनावर
धीरज कुमार यांचं पार्थिव उद्या 16 जुलै 2025 रोजी सकाळी 6 ते 10 च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. अनेक कलाकरांकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘या’ चित्रपटांमध्ये साकरल्या भूमिका
धीरज कुमार एक असे दिग्गज कलाकार होते ज्यांनी अभिनय, दिग्दर्श आणि निर्मिती क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या अभिनयातील करिअरला 1970 ला सुरूवात झाली. त्यात त्यांनी ‘दीदार’, ‘रातों का राजा’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘शराफत छोड़ दी मैंने’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘सर्गम’, ‘क्रांति’, ‘मान भरों सजना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 21 पंजाबी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं.
तर दिग्दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ‘आबरा का डाबरा’ आणि ‘काशी: इन सर्च ऑफ गंगा’ या चित्रपटांचं तर ‘ओम नमः शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘अदालत’, ‘संस्कार’, ‘धूप-छांव’, ‘जोड़ियां कमाल की’ आणि ‘सिंहासन बत्तीसी’ यांसारख्या प्रसिद्ध शो आणि मालिकांचं दिग्दर्शन केलं. तसेच त्यांनी ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘श्री गणेश’, ‘ॐ नमः शिवाय’, ‘इश्क सुभान अल्लाह’ आणि ‘संस्कार’ यांसारख्या मालिकांची आणि
‘काशी: इन सर्च ऑफ गंगा’ आणि कुछ पंजाबी चित्रपटां निर्मिती केली.