मी पक्षाची शिस्त मोडलेली नाही; रुपाली ठोंबरे यांचा पक्षाला खुलासा, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का ?

Rupali Patil Thombre-मी पक्ष सोडणार नसून, राष्ट्रवादीकडून कसबामधून महानगरपालिका निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

I have not broken party discipline; Rupali Thombre's clarification to the party, will she resign from the NCP?

I have not broken party discipline; Rupali Thombre's clarification to the party, will she resign from the NCP?

Rupali Patil Thombre On Ncp Notice: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar) यांच्याविरोधात भूमिका घेणे रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांना भोवले आहे. याप्रकरणी पक्षाने रुपाली पाटील यांना सात दिवसात खुलासा मागितला होता. तसेच त्यांचे प्रदेश प्रवक्तेपद काढून घेतल्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केलीय. मी पक्ष सोडणार नसून, राष्ट्रवादीकडून कसबामधून महानगरपालिका निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
(I have not broken party discipline; Rupali Thombre’s clarification to the party, will she resign from the NCP?)


आगामी निवडणुकांसाठी भाजप पाठोपाठ अजितदादांचे 40 शिलेदारही मैदानात

रुपाली पाटील म्हणाल्या, मी पक्षाला खुलासा पत्राला उत्तर पाठविले आहे. राज्य महिला आयोगा हा संविधान स्वतंत्र विभाग आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्याबाबत कुठेलही वक्तव्य केलेले नाही. मी कोणतीही शिस्त भंग केली नाही मी केवळ राष्ट्रीय अध्यक्षांच्या मताचा सन्मान ठेवून भूमिका मांडली आहे. राज्य महिला आयोग तथा प्रदेशाध्यक्ष महिला यांच्याबाबत कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे, याविषयीची नोटीसमध्ये कोणतीही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नसल्याचे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.


… तर आम्ही आवाज उठवू; OBC उमेदवारीवरुन लक्ष्मण हाकेंचा इशारा

तसेच राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष हे पूर्णपणे स्वतंत्र विभाग आहेत. त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते. त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला सुद्धा रोषाला सामोरे जावे लागले होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतर मी स्वतः बीड येथे जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबाची आणि आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे फोन द्वारे बोलणे करून दिले होते. त्यावेळी दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नाही असे सांगितले होते, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.


कोणतीही शिस्तभंग झालेली नाही-ठोंबरे

मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझं मत मांडलं होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणी हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्तभंग झालेला नसल्याचे ठोंबरे यांनी पत्रात म्हटले आहे.


आमचे पद का काढून घेतले याची विचारणा करणार

माझे प्रवक्तेपद काढून घेतले आहे. त्याबाबत मी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेणार आहेत. मला पुन्हा प्रवक्तेपद का देण्यात आलेले नाही, याबाबत मी विचारणा करणार असल्याचे रुपाली ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. सहा ते आठ महिन्यापासून आम्हाला पदावरून काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याबाबचे पुरावे मी अजितदादांसमोर ठेवणार आहे.


दोन्ही शिवसेनेसह भाजपकडून ठोंबरेंना ऑफर

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप यांच्याकडूनही मला पक्षात येण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. परंतु मी सध्या राष्ट्रवादीत राहणार असल्याची राजकीय भूमिका रुपाली ठोंबरे यांनी जाहीर केलीय.

Exit mobile version