Download App

रोहित पवारांनी ‘या’ तीन मतदारसंघावर ठोकला दावा, थेट शरद पवार अन् जयंत पाटलांकडं केली मागणी

अजित गव्हाणे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. त्यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते.

  • Written By: Last Updated:

NCP Mla Rohit Pawar : येत्या डिसेंबर महिन्यात शरद पवार (Sharad Pawar) यांचा 85 वा वाढदिवस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ठरवलय आम्हाला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील हे वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुमारे 85 आमदार निवडून आणायचे आहेत. असं म्हणत मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे पिंपरी चिंचवड आणि भोसरी  हे तीनही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे असावेत अशी विनंती आमदार (Rohit Pawar ) रोहित पवार यांनी यावेळी केली. ते पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रमात बोलत होते. तसंच, आमदारच नाही तर महानगरपालिकेतही आपले 85  जागा आपल्याचं असायला हव्यात असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाला येण्यासाठी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आडवल्याचा आरोपही रोहित पवारांनी यावेळी केला.

ही पद्धत भाजपची बांगलादेशात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; १०५ जणांचा मृत्यू, ४०० भारतीय नागरिकांची सुटका

एखाद्या कामाचं श्रेय जर कुणाला घ्यायचं असेल तर ते घेता येत नाही. सर्वांना ते दिलं पाहिजे. कारण एखादा पदार्थ बनवताना त्याला लागणाऱ्या समानापासून ते बनवण्यापर्यंत अनेक हातांची मदत झालेली असते. परंतु, वाढणाऱ्याला वाटत हे मीच बनवलय अशा आवेशात तो वाढत असतो असं म्हणत रोहित पवारांनी कुणाचं नाव न घेता टोलेबाजी केली. तसंच, अशी ही श्रेय घेण्याची पद्धत भाजपमध्ये आहे. ‘मी’पणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे. असा थेट घणाघातही रोहित पवारांनी भाजपवर यावेळी केला.

सत्ता आल्यावर सोडणार नाही

आमचा कार्यक्रम सुरु होताना अनेक लोकांना या कार्यक्रमाला यायचं होतं. परंतु, येथे काही पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. ही काही सत्ताधाऱ्यांची सभा नाही. शरद पवारांवर प्रेम असणारे हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. परंतु, लक्षात ठेवा फक्त तीन-ते चार महिन्यांचा कालावधी राहीलाय. त्यानंतर आमची सत्ता येणार आहे. आज जर असं वागत असतील तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा थेट इशाराच रोहित पवारांनी यावेळी पोलिसांना दिला आहे.

शहर वाटून घेतलं चहा, जेवण उशीरा मिळते; मनोरमा खेडकरांच्या तक्रारीनंतर कोठडीतील फुटेज कोर्टाने मागितले

टीडीआर खोटाला 700 कोटींचा, महापालिकेच्या रस्ते आणि गटार सफाईच्या टेंडरमध्ये 2500 कोटींचा भ्रष्टाचार झाला, पिंपरी चिंचवड जॅकलेल दिडशे, लॉंड्री मशिनमध्ये भ्रष्टाचार झाला. कुत्र्याचं ऑपरेश करण्यात मोठा भ्रष्टाचारर झालाय. तसंच, तसंच, इथल्या तिन नेत्यांनी हे शहर वाटून घेतलय. तु त्याला टेंडर दे मी याला देतो असं म्हणत इथ वाटणी झाली असून मोठ्या भ्रष्टाचाराचं जाळच इथ असल्याचा गंभीर आरोपही यावेळी रोहित पवारांनी केला आहे. काही मलिदा गँगला मोठ करण्यासाठी हे तीन नेते प्रयत्न करतात असंही रोहित पवार म्हणालेत.

 

follow us