अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुंड आणि त्यांच्या कुटूंबीयांना (Pune) पक्षाची तिकीटं देऊन गुंडांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना राजकीय पाठबळ देणारे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुण्यनगरीला गुंडांच्या टोळीयुद्धात ढकलू पाहणारे पुण्यातील गुंडांचे अजित पवार आका आहेत अशी महाराष्ट्र काँग्रेसच्या फेसबुकवरून करण्यात आली आहे. गुंड बंडू आंदेकरसह गजा मारणे यांचे फोटो या पोस्टमध्ये वापरण्यात आले आहेत. या पोस्टवर अनेक लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, पक्ष्याकडून गुंड आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तिकीट देण्यात आल्याचे आरोप आहेत. यामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरणातील लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर, तसेच कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांचा समावेश आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ; अजित पवारांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
यावर अजित पवारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) सोबतच्या युतीचा दाखला देत, काही जागा खरात गटासाठी सोडल्या होत्या आणि त्यांनीच उमेदवारांची निवड केली, असे म्हटले. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार लढत असले तरी, उमेदवारीचा अंतिम निर्णय खरात गटाचा होता, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणावरून अजित पवारांच्या पूर्वीच्या गुन्हेगारांविरोधातील भूमिका आणि सध्याच्या कृतीमध्ये फरक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या प्रकारामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण आणखी गोंधळाचे आणि तापलेले झाले आहे. शहरातील पारंपरिक राजकीय गटांसोबतच नवीन आणि अप्रत्याशित ताकदींचाही प्रभाव जाणवणार असल्याचे यात दिसून येत आहे.
