धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणात आढळल्या अळ्या, विद्यार्थ्यांमध्ये संताप

Insect Found In food Of Pune Savitribai Phule University Hostel : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहातून (Pune Savitribai Phule University ) एक धक्कादायक बातमी समोर आलीय. विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात अळ्या सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या 8 नंबरच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर जेवणात वारंवार अळ्या, झुरळ सापडत असल्याचा (Pune News) आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. […]

_Pune Savitribai Phule University

_Pune Savitribai Phule University

Insect Found In food Of Pune Savitribai Phule University Hostel : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहातून (Pune Savitribai Phule University ) एक धक्कादायक बातमी समोर आलीय. विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात अळ्या सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या 8 नंबरच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर जेवणात वारंवार अळ्या, झुरळ सापडत असल्याचा (Pune News) आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

इतिहासाचा गौरव करणे महान पण… छावाबाबतच्या आक्षेपार्ह विधानानंतर स्वरा भास्करचा युटर्न!

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या (Pune University) जेवणात झुरळ आणि अळ्या आढळून आल्यात. घडलेल्या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तर घटनेची माहिती मिळताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकास जाब विचारत मेस बंद केलीय.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं समोर आलंय. वसतिगृह क्रमांक आठमध्ये 15 दिवसांत दुसऱ्यांदा जेवणात अळ्या सापडल्या आहेत. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही, असा देखील आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय.

VIDEO : सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला, शिर्के घराण्याचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर आरोप

या घटनेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. मागील काही दिवसांपूर्वी विद्यापीठामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला होता. आता विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळ्या सापडल्या आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासन या गोष्टी गांभीर्याने घेत नाही. यावर काहीही उपाययोजना होत नाही, त्यामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढतच आहे. उंदीर चावल्यामुळे पुणे विद्यापीठात एक विद्यार्थी जखमी झाला होता, तर दोन विद्यार्थ्यांना रेबिजची लक्षणं देखील आढळून आली होती. विद्यापीठाचा गलथान कारभार विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याविरोधात त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

 

Exit mobile version