Download App

Kalyani Nagar Car Accident मध्ये नवा ट्विस्ट; अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी संबंध?

Kalyani Nagar Car Accident मध्ये धक्कादायक ट्विस्ट अल्पवयीन मुलाचे आजोबांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्याशी संबध असल्याची माहिती

Kalyani Nagar Car Accident Minor Grandfathers Relations with Underworld : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये ( Kalyani Nagar Car Accident ) 19 मे च्या पहाटे दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी कार भरधाव वेगात चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. या अपघातातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ( Underworld ) याच्याशी संबध असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

19 मे च्या पहाटे पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी कार भरधाव वेगात चालवत ( Kalyani Nagar Car Accident ) एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. सुरुवातीला ही घटना अगदी सामान्य वाटली. मात्र जसजशा या घटनेतील वेगवेगळ्या बाजूस समोर येत गेल्या तस तशी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. यात आता या मुलाच्या आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्याशी संबध असल्याची माहिती समोर आली आहे.

Kalyani Nagar Car Accident : बिल्डर पुत्राला नोटीस; हजर न राहिल्यास फरार घोषित करणार

भावांसोबत झालेल्या संपत्तीच्या वादामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या वादात अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न देखील झाला होता. या प्रकरणी सुरेंद्र कुमार यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये पुणे पोलिसांकडून मोक्का लावणे अपेक्षित असताना केवळ आयपीसीची कलमं लावून गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपपत्र दाखल करेपर्यंत सुरेंद्र कुमार यांना अटकही झाली नव्हती.

“माझा नातू अभ्यासात लक्ष देईल”; आजोबांची गॅरंटी अन् बिल्डरपुत्राला मिळाला जामीन

सुरेंद्र कुमार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपत्रामध्ये असे स्पष्ट नमुद केले गेले होते की, त्यांनी छोटा राजनचा हस्तक विजय तांबटची बॅंकॉकला जाऊन भेट घेतली होती. छोटा राजन भारतात परतल्यावर सीबीआयच्या तपासात अग्रवाल यांचं हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर अग्रवाल यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयात अर्ज केल्यावर त्यांना जामीनही देण्यात आला होता. त्यामुळे या कुटुंबाचं हे अपघात प्रकरणच नाही तर आजोबांपासूनची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येत आहे. तसेच या घटनेमध्ये तपासाची चक्र पुढे जात असताना नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. तसेच पुणे पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

follow us

वेब स्टोरीज