“माझा नातू अभ्यासात लक्ष देईल”; आजोबांची गॅरंटी अन् बिल्डरपुत्राला मिळाला जामीन

“माझा नातू अभ्यासात लक्ष देईल”; आजोबांची गॅरंटी अन् बिल्डरपुत्राला मिळाला जामीन

Pune Porsche Car Accident : दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या (Pune Porsche Car Accident) अपघातात दोन निष्पाप लोकांचा जीव गेला. हा अपघात पुण्यातील नामांकित बिल्डर विशाल अगरवाल यांच्या (Porsche) अल्पवयीन आणि मद्यधुंद मुलाकडून घडला. यात पोलिसांनी मुलाला अटक केली, न्यायालयात हजर केले. पण अवघ्या 15 तासांतच त्याची जामिनावर सुटकाही (Pune Accident) झाली. पण न्यायाधीशांनी त्याला कशाच्या आधारावर जामीन दिला हाच प्रश्न आता विचारला जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी न्यायालयात माझा नातू वाईट संगतींपासून दूर राहिल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल अशी हमी दिली. त्यामुळे न्यायालयाने या मुलाला जामीन मंजूर केला.

इतका गंभीर गुन्हा केल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलेली शिक्षा आणि जामीन याचीच चर्चा होत आहे. न्यायालयाने कोणत्या आधारावर जामीन दिला असा प्रश्न लोकांना पडला आहे. अपघातानंतर या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले. यावेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की घटना गंभीर आहे पण जामीन मिळण्याची तरतूद आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद तत्काळ ग्राह्य धरला आणि जामीनही देऊन टाकला.

‘त्या’ मुलामुळे माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली’; पुणे अपघातानंतर आमदार पत्नीने सांगितली कटू आठवण

प्राथमिक दृष्ट्‍या असे दिसून येत आहे की अपघाताच्या दिवशी आरोपीने मद्यप्राशन करत असल्याचे प्रतीत होत असतानाही परंतु, पोलिसांनी हा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला नाही कारण याबाबतचा अहवाल मिळालेला नव्हता. न्यायालयाने जामीन देताना ज्या अटी टाकल्या त्यामुळे सगळेच कोड्यात पडले आहेत. सध्या या अटींचीच सगळीकडे चर्चा होत आहे.

न्यायालयाने या अटींच्या आधारे दिला जामीन

वकिलांनी न्यायालयाला आश्वस्त केले की आरोपी पुराव्यांशी छेडछाड करणार नाही आणि पळूनही जाणर नाही. मुलाचे आजोबा म्हणाले की वाईट संगतींपासून त्याला दूर ठेऊ. आता येथून पुढे तो अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल. अल्पवयीन आरोपी पंधरा दिवस वाहतूक पोलिसाबरोबर चौकात उभा राहून वाहतुकीचे नियमन करील. मानसिक उपचारही घ्यावे लागतील तसेच भविष्यात त्याच्यासमोर काही दुर्घटना घडली तर या दुर्घटनाग्रस्त लोकांना तो मदत करील अशा अटी टाकून न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Pune Accident News : ट्रकचालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? राहुल गांधी संतापले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube