Kalyani Nagar Car Accident : कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राऊतांना CP चं थेट चॅलेंज
पुणे : कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता राऊतांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) थेट चॅलेंज दिले आहे. (Pune Police CP Amitesh Kumar On Sanjay Raut Allegation)
Kalyani Nagar Accident : बिल्डर विशाल अग्रवालसह बार मालक, मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात
… तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे
पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्या राऊतांसह सर्व विरोधकांना आयुक्तांनी थेट आव्हान दिले आहे. पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.
राऊतांनी उपस्थित केले अनेक प्रश्न
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या भीषण अपघातात पुणे पोलिसांकडून ज्या पद्धतीने कारवाई केली जात आहे ते बघाता पुण्यातील पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे. पोलीस आयुक्त नेमकं कोणाला मदत करतात? बिल्डरांचा मुलगा बारमध्ये दारू पिताना दिसतोय, त्याचे व्हिडिओ देखील बाहेर आले आहेत. त्याचे तुम्ही रिपोर्ट काय देतात? कोणी केलं हे सर्व? भ्रष्ट पोलीस आयुक्त आणि पुण्यातील एक आमदार आहे असाही आरोप राऊतांनी केला आहे.
Pune Accident News : पोलिसांवर राजकीय दबाव? आमदार सुनिल टिगरेंनी दावा खोडला…
मेडिकल रिपोर्ट देखील खोटा आलेला आहे. त्यांच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. असे आयुक्त पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे. पोलीस आयुक्त आणि न्यायालयाने दोन आखे बारा सिनेमा चालू केला आहे का? हा सर्व पैशाचा खेळ आहे. हा प्रकार म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असल्याचेही राऊतांनी म्हटले होते.
कुणाचाही दबाव नाही
या प्रकरणात जे दोन जीव गेले त्यांना न्याय निळावा यासाठी पुर्णपणे तपास सुरू आहे. यामध्ये कुणाचाही आमच्यावर दबाव नव्हता, नाही आणि कधीच नसेल अशी प्रतिक्रिा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसंच, दुर्देवाने कोर्टाने आमचे काही अर्ज फेटाळले अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आम्ही आमचं कर्तव्य बजाबत असतो. आम्हाला कुणाचा दबाव असल्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले.
Pune Accident : होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो; बिल्डर पुत्राची पोलिसांना कबुली
दोन अर्ज फेटाळले
आम्ही कोर्टात दोन अर्ज केले होते. त्यामध्ये एक आरोपीला प्रौढ ठरवण्याचा होता आणि दुसरा रिमांड होमचा अर्ज होता. दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले असंही अमितेश कुमार म्हणाले. परंतु, आमची भूमिका ही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशीच आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, चौकशी केली असता या प्रकरणातील कार चालक दारू प्यायलेला होता हे स्पष्ट झालं आहे असंही अमितेश कुमार म्हणाले आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना धमकावण्याचे प्रकार
या भीषण अपघातात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना आणि मित्रांना धमकावण्याची बाब ऐकण्यात आली असल्याचेही अमितेश कुमार म्हणाले. मात्र, अद्याप याबाबत संबंधित नातेवाईकांकडून तक्रार आलेली नाही. परंतु, आम्ही याबाबतची चौकशी करत आहोत. अटक करण्यात आलेल्या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असून, पबचे मालक आणि व्यवस्थापकसह अन्य आरोपींना आज (दि.21) कोर्टात हजर केले जाणार आहे. तर, अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना उद्या (दि.22) कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सीपींनी स्पष्ट केले. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना वाईट वागणुक किंवा आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.