Ketan Agarwal Murder : खेळ संपला! सिया अन् चेतन पुरते अडकले…पोलिसांना माफीचा साक्षीदार भेटला?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आलीयं.

ketan agrawal

ketan agrawal

Ketan Agarwal Murder : पुण्यातील उद्योजक विशाल अग्रवाल यांच्या 24 वर्षीय केतन अग्रवालची (Ketan Agarwal Murder) लोहगडावरुन ढकलून देत हत्या करण्यात आली. केतन अग्रवालची होणार पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आता याच प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून पोलिसांनी माफीचा साक्षीदार शोधून काढलायं. पोलिसांनी तिसऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

पासपोर्ट सेवा दिनी केंद्राचा मोठा खुलासा; पासपोर्ट हा केवळ प्रवासाचा दस्तऐवज, नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण

केतनच्या वडिलांना आपल्या मुलाचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर सिया आणि चेतनला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी अजूनही आरोपी असू शकतात, असाही अंदाज केतनच्या वडिलांना लावला. त्यानंतर पोलिसांनी तपासमोहिम सुरु करीत चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमारला ताब्यात घेतलंय.

देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अन् रेशन व्यवस्थेत मोठ्या बदलाची शक्यता; काय बदल होणार?

ज्यावेळी सिया आणि केतन लोहगडावर गेले होते. त्यावेळी चेतन चौधरीने मुद्दाम आपला फोन दुकानातच ठेवला होता. यावेळी त्याने स्वत:जवळ कर्मचारी नीरज कुमारचा मोबाईल सोबत ठेवला होता. त्याने असं पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच केल्याचं उघड झालंय. याच नीरजच्या मोबाईलवरुन सिया आणि चेतनचे संभाषण सुरु होते.

ग्रामीण भागातील सायंकाळच्या लोडशेडिंगविरोधात विधानसभेत आमदार खताळ आक्रमक

पोलिसांनी दोघांमधील होत असलेलं सततंच बोलणं. तांत्रिक तपासातून उघडकीस आणलं आहे. त्यामुळे आता सिया आणि चेतन विरोधात पोलिसांना भक्कम पुरावा मिळाला आहे. यासोबतच नीरज कुमार हा माफीचा साक्षीदार होण्यासही तयार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सिया आणि चेतन दोघेही पुरते अडकलेच असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, सुरुवातीला हा अपघात वाटत होता, केतनच्या वडिलांना संशय बळावल्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन चौधरीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, सियाचे लग्न केतन अग्रवालसोबत ठरलं होतं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. यामुळे या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेलं. नंतर प्रियकर चेतन चौधरी यालाही तेथे बोलावून घेतलं. लोहगड किल्ल्यावर दोघांनी केतनला डोंगरावरून खाली ढकलून दिलं व त्याचा खून केल्याचं चेतनने चौकशीत सांगितलं.

Exit mobile version