Khadakwasla Dam : राज्यात मान्सूनची सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु असताना देखील पुण्यातून एक मोठी बातमी समोर आल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. माहितीनुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा या वर्षी 1 जुलैला गेल्या दहा वर्षांतील सर्वांत खालच्या पातळीवर पोहोचला आहे.
खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) आता फक्त 15.47 टक्के उपयुक्त साठा आहे. तर दुसरीकडे पवा, वरसगाव आणि पानशेत धरणांमधील उपयुक्त साठा दुष्काळी वर्षांच्या तुलनेत समाधानकारक असल्याची माहिती समोर येत आहे.
मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर पुण्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. पुण्यात सध्या रिमझिम पाऊस सुरु असल्याने टेमघर धरणातील उपयुक्तसाठा पूर्णपणे शून्यावर आल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ होत आहे. 2016 ,2019 आणि 2022 मध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. तर दुसरीकडे 2017 नंतर खडकवासला धरणातीही उपयुक्तसाठी दशकातील सर्वात खालच्या पातळीवर आहे. तर 2016,2018,2019 आणि 2022 या कमी पर्जन्यमान झालेल्या वर्षांच्या तुलनेत पानशेत, वरसगाव आणि पवना धरणांमध्ये पाणीसाठा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या खडकवासला धरणात 15.47 टक्के उपयुक्त साठा असून यापेक्षा कमी साठा 2017 मध्ये नोंदविला गेला होता.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? सचिन अहिरनंतर बडा नेता सोडणार पक्षाची साथ
खडकवासला धरणात पाणी साठ्यात वाढ
तर दुसरीकडे मागील तीन -चार दिवसांपासून पुण्यात सुरु असणाऱ्या रिमझिम पावसामुळे वरसगाव धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पाणीसाठ्यात किंचित वाढ नोंदली गेली आहे. माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघरमध्ये 15 मिमी, पानशेतमध्ये 14 मिमी, वरसगावमध्ये 13 मिमी आणि खडकवासला येथे 4 मिमी पाऊस झाला.
