Download App

Lalit Patil Case : मोठी अपडेट! ललित पाटील प्रकरणात ‘ससून’मधील कर्मचाऱ्याला बेड्या

Lalit Patil Case : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात (Lalit Patil Case) आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने ससून रुग्णलयातील (Pune News) आणखी एका कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा कर्मचारी कारागृहातून रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची बडदास्त करत होता. महेंद्र शेवते असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला अटक झाल्याने रुग्णालयात मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात आणखी कोणता मोठा मासा गळाला लागतो, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून रुग्णालयातील ही पहिलीच अटक आहे. याआधीही काही जणांना अटक केली आहे.

Pune Drug Case: ललित पाटील प्रकरणी दोन पोलिसांना अटक, हलगर्जीपणा भोवला

ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पळून गेला होता. त्यानंतर मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. न्यायालयाच्या परवानगीने ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या नाशिक येथील घराची झडती घेतली असता कोट्यावधी रुपयांचे सोने आढळले होते.

1 ऑक्टोबरला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता त्यावेळी हे दोघेही कैद्यांसाठी 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी दोषी असून त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई झाली नाही असे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले होते. राज्य सरकारसह पोलिसांच्या विरोधात पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा धंगेकर यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी हालचाली करत रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

ललित पाटील प्रकरणात आता येरवड्याचे अधिकारीही अडचणीत ! एकमेंकावर ‘ब्लेम गेम’

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ललित पाटीलवर पुण्यातील ससून रूग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरू होते. मात्र, कैदी असतानादेखील ललितला ससून रूग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पाटील लाखो रूपये खर्च करत असे. यानंतर आता ऐशोआरामासाठी ललित पाटील (Lalit Patil) खर्च करत असलेला आकडा समोर आला आहे.

Tags

follow us