Download App

ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना हटवले

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

पुणे : ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससून रूग्णालयचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. काँग्रेसचे खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ललित पाटीलला पळवून लावण्यात ठाकूर यांचा हात असल्याचे गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आज (दि.10) ठाकूर यांना ससूनच्या डीन पदावरून हटवण्यात आले आहे. (Sassoon Hospital Dean Sanjeev Thakur Suspended)

Video : …नंतर खुशाल आरक्षण वाढवा; जरांगे पाटलांनी दिला भुजबळांना ‘मास्टर’ फॉर्मुला

ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आलं होतं, असं विधान ललितने प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर केलं होतं. त्यानंतर ललितला पळून जाण्यात कुणाचा हात होता? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर, धंगेकरांनी थेट आरोप करत पाटीलला पळवून लावण्यात संजीव ठाकूर यांचाच हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

Lalit Patil : ससूनमध्ये ललित पाटील ऐशोआरामासाठी प्रतिमहिना खर्च करत होता 17 लाख

ललित पाटील यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक मंत्री ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना फोन करत होते. या मंत्र्याचे गुन्हेगारी जगतात चांगले संबंध आहेत. मंत्री गुन्हेगारांसोबत फिरताना दिसतो. ललित पाटील याला मोकोका लावण्यात आला, त्याचबरोबर संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून त्यांच्यावरही मोकोको लावण्याची मागणीदेखील धंगेकर यांनी केली आहे.

धंगेकरांच्या आरोपांवर काय म्हणाले होते ठाकूर

ललित पाटील प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर संजीव ठाकूर यांनी अधिष्ठाता हे कॉलेज आणि रुग्णालयाची देखभाल करण्याचे काम करतात. व्यवस्थापक, वैद्यकीय व्यवस्थापक यांचे पूर्ण नियंत्रण रुग्णालयावर असते. डॉक्टरांचे काम रुग्णावर उपचार करणं असतं. पळवून लावण्यात कुठल्या डॉक्टरचा हात असेल असे मला वाटत नाही. कोण काय म्हणतं यावर भाष्य करू शकत नसल्याचे स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले होते.

Tags

follow us

वेब स्टोरीज