Devendra Fadnavis On Pune Ganeshotsav Rally Dispute : पुण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच (Pune Ganeshotsav) विसर्जनाचा वाद सुरू झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, पुणे म्हटल्यानंतर चर्चा, वाद-विवाद या सगळ्या गोष्टी होतातच. परंतु काळजी करू नका. यासंदर्भात मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने बैठक घेणार (CM Devendra Fadnavis) आहेत. मंडळं सगळे मिळून काहितरी निर्णय घेतील. दरवर्षी काही ना काही वाद निर्माण होतो, अन् दरवर्षी वाद मिटवतात. मला पुणेकरांचा अनुभव आहे, ते चर्चेअंती समस्या (Ganeshotsav) सोडवतील, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
दरवर्षी वाद निर्माण होतात…
पुणे म्हटल्यानंतर चर्चा वादविवाद होतात, परंतु काळजी करण्याची गरज नाही. यासंदर्भात आमदार हेमंत रासने आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्वतः बैठक घेणार आहेत. सर्व मंडळे एकत्र बसून निर्णय करतील, दरवर्षी वाद (Maharashtra Politics) निर्माण होतात मात्र सर्वजण मिळून तो सोडवतात. राज्य सरकारने यामध्ये मध्यस्थी करण्याची गरज नाही. पुणेकर चर्चेअंती एकमत करतील, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अजितदादांकडून तीन महापालिकांची घोषणा, CM फडणवीसांनी मात्र दावा खोडला, म्हणाले, पुण्यासाठी..
गणेश विसर्जन मिरवणुकीवरून वाद
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरून वाद निर्माण झालाय. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व प्रमुख मंडळांची लवकरच एक संयुक्त बैठक आयोजित केली जाणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
अजितदादांकडून तीन महापालिकांची घोषणा, CM फडणवीसांनी मात्र दावा खोडला, म्हणाले, पुण्यासाठी..
मानाच्या पाच मंडळांची मिरवणूक
यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळाने, मानाच्या पाच मंडळांची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर विसर्जन मिरवणुकीतील सहभागाच्या वेळेवरून विविध मंडळांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली होती. पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. मिरवणुकीतील क्रमांकाबाबत पोलीस स्वतःहून कोणताही निर्णय घेणार नाहीत. जी परंपरा आहे, ती अबाधित राहावी, यासाठी सर्व गणेश मंडळांनी एकत्र बसून विसर्जन मिरवणुकीबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय.