अजितदादांकडून तीन महापालिकांची घोषणा, CM फडणवीसांनी मात्र दावा खोडला, म्हणाले, पुण्यासाठी..

अजितदादांकडून तीन महापालिकांची घोषणा, CM फडणवीसांनी मात्र दावा खोडला, म्हणाले, पुण्यासाठी..

Devendra Fadnavis on Ajit Pawar Municipalities Announcement : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल (Ajit Pawar) सकाळीच चाकण चौकातील वाहतुकीची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठिकठिकाणची वाहतूक कोंडी (Pune Traffic) कमी करण्यासाठी पुणे जिल्ह्यात तीन महापालिका कराव्या लागतील असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला. नव्याने फक्त एकच महापालिकेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या चौकातील वाहतुकीची पाहणी करण्यासाठी अजित पवार काल सकाळीच येथे आले होते. याच चौकातून एमआयडीसीत जावे लागते. या एमआयडीसीत दीड हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांत साडेतीन लाखांच्या आसपास कर्मचारी काम करतात. त्यामुळे परिसरात हजारो वाहनांची ये जा सुरू असते. या चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्याची गरज आहे. यासाठी ठोस निर्णयाची गरज आहे. त्यामुळे चाकणला स्वतंत्र महापालिका होणार असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले होते.

पुणे जिल्ह्यात होणार तीन महापालिका

चाकण आणि परिसरात नवी महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल किंवा आवडणार नाही पण हे आता करावंच लागणार आहे. पुणे जिल्ह्यात तीन महानगरपालिका कराव्या लागणार आहेत. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका, चाकण आणि हिंजवडी परिसरात एक एक महापालिका करावी लागणार असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले होते.

कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो, ह्यांनी फक्त उपदेश घ्यायचे; अजित पवारांची तुफान फटकेबाजी

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर पुणे जिल्ह्यात नेमक्या किती महापालिका होणार याची चर्चा सुरू झाली होती. पुणे महापालिकेच्या हद्दीत 32 गावांचा समावेश झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेपेक्षा पुणे महापालिकेची हद्द मोठी झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे विभाजन करुन नवी महापालिका स्थापन करण्याची मागणी होत आहे.

पुण्यासाठी एकच मनपा गरजेची

पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिकेलगत नागरीकरण वाढल्याने येथेही नवीन महापालिका स्थापन करावी अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभुमीवर काल अजित पवार यांनी शु्क्रवारी चाकण परिसराची पाहणी केली. येथील वाहतूक कोंडीची समस्या पाहून पुण्यासाठी तीन महापालिका गरजेच्या आहेत असे सांगितले होते. मात्र त्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काहीशी वेगळी होती. सध्या पुणे जिल्ह्यात दोन महापालिका अस्तित्वात असून त्याशिवाय आणखी एका महापालिकेची गरज आहे असेच पवार यांना म्हणायचे असावे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार, अजित पवारांनी काय सांगितलं?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube