Download App

TCS ला कामगार विभागाची नोटीस : भारतातील सर्वात मोठ्या IT कंपनीशी शिंदे सरकारचा पंगा

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) नोटीस बजावली आहे. तब्बल दोन हजार कर्मचाऱ्यांच्या जबरदस्तीने बदल्या केल्याचा आरोप टीसीएसवर करण्यात आला आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट या कामगार संघटनेच्या तक्रारीनंतर कामगार विभागने ही नोटीस बजावली आहे. ही संघटना IT/ITeS आणि संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करते. (Maharashtra government’s labour department has issued notice to India’s largest IT services company, Tata Consultancy Services )

नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कामगार विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, टीसीएसने 2 हजारहून अधिक कर्मचार्‍यांना वेगळ्या शहरात स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ न देता बदली केली. त्यांना कोणशीही कोणतीही चर्चा करण्याचीही संधी दिली, त्यामुळे कर्मचार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय बदलीच्या निर्देशांचे पालन न केल्यास कंपनीने कर्मचार्‍यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी दिली होती, असाही दावा केला आहे.

झारखंड सरकारवर ‘ईडी’चा बुलडोझर; मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनाम्याच्या तयारीत

आपल्याला 300 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, यात वेगवेगळ्या शहरांमध्ये जबरदस्ती जाण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. असा दावा करत टीसीएसचे कर्मचाऱ्यांच्या बदलीचे धोरण हे कामगार कायद्यांचे उल्लंघन आहे का याचा तपास करावा आणि असल्यास आवश्यक ती कडक कारवाई करावी अशी मागणीही कंपनीने या तक्रारीत केली आहे. कामगार विभागाने 18 जानेवारी रोजी होणाऱ्या औपचारिक बैठकीत टीसीएसला या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Hit and Run : नव्या कायद्यात नेमकं काय? कठोर तरतुदींचा उल्लेख करत असीम सरोदेंनी केंद्राला सुनावलं

कर्मचाऱ्यांना केलेल्या मेलमध्ये काय म्हंटले आहे?

टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत बदली करण्यात आल्याचा मेल पाठविण्यात आला आहे. यात हा मेल तुमची मुंबईला बदली केल्याच्या आदेशासंदर्भात आहे. तुम्हाला 14 दिवसांच्या आत मुंबई ऑफिसला रिपोर्ट करुन बदली प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 14 दिवसांच्या आत बदलीच्या ठिकाणी जाण्यास अयशस्वी ठरला तर तात्काळ प्रभावाने तुमचा पगार थांबविण्याचा अधिकार कंपनीकडे राखीव आहे, असेही या मेलमध्ये म्हंटले आहे.

follow us